T-20 World Cup : पहिल्या पेपरात टीम इंडिया पास, सराव सामन्यात इंग्लंडवर ७ विकेटने मात
२४ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपआधी भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ विकेट राखून मात केली आहे. इशान किशन आणि लोकेश राहुल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडने विजयासाठी दिलेलं १८९ धावांचं आव्हान पूर्ण केलं. सराव सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्माला […]
ADVERTISEMENT
२४ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपआधी भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ विकेट राखून मात केली आहे. इशान किशन आणि लोकेश राहुल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडने विजयासाठी दिलेलं १८९ धावांचं आव्हान पूर्ण केलं.
ADVERTISEMENT
सराव सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्माला विश्रांती देत भारताने या सामन्यात लोकेश राहुल आणि इशान किशनला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे इंग्लंडने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी काही सुरेख फटके खेळले. मोहम्मद शमीने बटलरला क्लिन बोल्ड करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने जेसन रॉयही शमीच्या जाळ्यात अडकला.
मलान आणि बेअरस्टो यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. धोकादायक ठरु पाहणाऱ्या मलानला राहुल चहरने आऊट केलं. यानंतर लिव्हींगस्टोन आणि बेअरस्टो यांनी पुन्हा एकदा निर्णयाक भागीदारी करत इंग्लंडसाठी भराभर धावा जमवल्या. या जोडीच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने महत्वाचा शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. ५२ धावांची भागीदारी झाल्यानंतर पुन्हा एकदा शमीनेच लिव्हींगस्टोनचा अडसर दूर केला.
हे वाचलं का?
दुसरीकडे बेअरस्टो एक बाजू लावून फटकेबाजी करत होता. परंतू त्यांचं अर्धशतक केवळ एका धावेने हुकलं. बुमराहने त्याला माघारी धाडलं. अखेरच्या फळीत मोईन अलीने आपली उपयुक्तता सिद्ध करत २० बॉलमध्ये ४ फोर आणि २ सिक्स लगावत ४३ धावांची खेळी करत संघाला १८८ धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून मोहम्मद शमीने ३ तर बुमराह-चहरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
T20 WC : विराट कोहली म्हणाला, ‘वर्ल्डकप स्पर्धेत मी रोहितसोबत ओपनिंगला येणार नाही’
ADVERTISEMENT
प्रत्युत्तरादाखल भारताची सुरुवात मात्र चांगलीच आक्रमक झाली. आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममुळे चर्चेत असलेल्या लोकेश राहुलने इंग्लंडच्या बॉलर्सचा समाचार घेण्यास सुरुवात केली. राहुलचा खेळ पाहून फॉर्म मिळवण्यासाठी चाचपडणाऱ्या इशान किशनच्या अंगातही स्फुरण संचारलं. यानंतर त्यानेही इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या आव्हानातली हवाच काढून टाकली. लोकेश राहुलने २४ बॉलमध्ये ६ फोर आणि ३ सिक्स लगावत ५१ रन्सची इनिंग खेळल्यानंतर वुडने त्याला आऊट केलं.
ADVERTISEMENT
T-20 World Cup : तो आला आणि कामालाही लागला, मेंटॉर धोनीला नव्या रुपात पाहिलंत का?
यानंतर कॅप्टन विराट कोहलीही फारशी चमक दाखवू शकला नाही, तो ११ रन्सवर लिव्हींगस्टोनच्या बॉलिंगवर आऊट झाला. परंतू दुसऱ्या बाजूने इशान किशनने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. सूर्यकुमार यादवही फारशी चमक दाखवू न शकल्यामुळे माघारी परतला. ऋषभ पंतच्या सहाय्याने किशनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ४६ बॉलमध्ये ७ फोर आणि ३ सिक्स लगावत ७० रन्स केल्यानंतर इशान किशनला ड्रेसिंग रुममधून माघारी बोलवण्यात आलं. यानंतर विजयासाठी आवश्यक असणाऱ्या धावा ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT