T-20 World Cup : ७० टक्के प्रेक्षकांना युएईत सामना पाहण्याची परवानगी
युएईमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकात सामने पाहण्यासाठी स्टेडीअममध्ये ७० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा चौदावा हंगाम आणि टी-२० विश्वचषक युएईत हलवला आहे. ओमानमध्ये टी-२० विश्वचषकाची प्राथमिक फेरी पार पडणार आहे. परंतू या ठिकाणी वादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून नंतर प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रविवारी शाहीन हे चक्रीवादळ ओमानच्या […]
ADVERTISEMENT
युएईमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकात सामने पाहण्यासाठी स्टेडीअममध्ये ७० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा चौदावा हंगाम आणि टी-२० विश्वचषक युएईत हलवला आहे. ओमानमध्ये टी-२० विश्वचषकाची प्राथमिक फेरी पार पडणार आहे. परंतू या ठिकाणी वादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून नंतर प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
ADVERTISEMENT
रविवारी शाहीन हे चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्यावर येऊन धडकलं. ज्यामुळे राजधानी मस्कतसह अनेक प्रमुख भागांमध्ये पाऊस पडत असून १० ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या प्राथमिक फेरीआधी ओमानमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ओमानमध्ये जलमय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणांवरही परिणाम झाला आहे.
भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआय आणि आयसीसीने युएई-ओमानमध्ये स्पर्धा भरवली. कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून प्रेक्षकांना टी-२० विश्वचषकाचे सामने पाहता यावेत यासाठी आयसीसी प्रयत्नशील असल्याचं प्रमुख अधिकऱ्यांनी सांगितलं. टी-२० विश्वचषक हा कोरोना महामारीत प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे ७० टक्के प्रेक्षकांना तिन्ही मैदानांवर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
शारजाह, अबुधाबी आणि दुबई अशा तीन शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. १४ नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार असून भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत रंगणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT