Ind vs Eng 2nd Test : भर मैदानात भिडले कोहली-अँडरसन, वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा अनुभवी बॉलर जेम्स अँडरसन चौथ्या दिवसाच्या खेळात मैदानावर भिडले. बॉलिंगदरम्यान जेम्स अँडरसन पिचच्या मधून चालत असल्याचं पाहून विराटने त्याला हे तुझं घर नाहीये…तुझ्या अंगणात खेळत नाहीयेस असं सुनावलं. स्टम्प माईकवर विराटचा हा आवाज रेकॉर्ड झाला असून या वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

यावेळी विराटने जेम्स अँडरसनला…त्याच्या आणि बुमराहसोबत झालेल्या वादावरुनही दोन-चार गोष्टी सुनावल्याचं काही क्रिकेट फॅन्सनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

विराट आणि जेम्स अँडरसन यांच्यातलं द्वंद्व आता प्रत्येक क्रिकेटप्रेमीला परिचीत आहे. याआधीही विराटचा मैदानातला आक्रमक स्वभाव आपण अनुभवला आहे. जेम्स अँडरसनने विराट कोहलीला पहिल्या टेस्ट मॅचमध्येही आऊट केलं होतं. पिचच्या मध्यभागी चालत जाण्याप्रकरणी अंपायरनी जेम्स अँडरसनला वॉर्निंगही दिली, याचदरम्यान कोहली आणि अँडरसनमध्ये वाद झाला.

हे वाचलं का?

Video : क्रिकेटच्या पंढरीत प्रेक्षकांचं लाजिरवाणं कृत्य, लोकेश राहुलला फेकून मारले शॅम्पेन कॉर्क

दरम्यान विराट कोहलीची ही झुंज फारकाळ टिकू शकली नाही. जेम्स अँडरसन विराटला आऊट करण्यात अपयशी ठरला असला तरीही युवा सॅम करनने कोहलीला आऊट केलं. कोहलीने २० धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावात शतक झळकावणारा लोकेश राहुल आणि आक्रमक फटकेबाजी करणारा रोहित शर्मा झटपट माघारी परतले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT