Tokyo Olympic 2020 : दिपीका कुमारी पदकापासून केवळ एक पाऊल दूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला तिरंदाज दिपीका कुमारीची धडाकेबाज कामगिरी सुरुच आहे. रशियाच्या केस्निका पेरोव्हावर अटीतटीच्या लढतीत ६-५ ने मात करत दिपीकाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तिरंदाजीत किमान कांस्यपदक मिळवण्यासाठी दिपीकाला आता एका विजयाची तर सुवर्णपदकासाठी दोन विजयांची गरज आहे.

ADVERTISEMENT

1/8 Eliminations च्या पहिल्याच सेटची दिपीकाने चांगली सुरुवात केली. २८-२५ च्या फरकाने पहिला सेट जिंकत दिपीकाने २ सेट पॉईंट जिंकले. परंतू दुसऱ्या सेटमध्ये रशियाच्या केस्नियाने बरोबरी साधत सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये दिपीकाने आपला सर्व अनुभव पणाला लावत २८-२७ अशी एका गुणाच्या फरकाने बाजी मारली.

परंतू रशियाच्या केस्नियाने चौथा सेट बरोबरी सोडवत आणि पाचव्या सेटमध्ये ३ गुणांच्या फरकाने सेट जिंकत पुन्हा एकदा सामना बरोबरीत सोडवला. अखेरीस निकाल शूट ऑफमध्ये घेण्यात आला. ज्यात रशियाच्या केस्नियाने ७ तर दिपीकाने १० गुणांची कमाई करत आपला विजय निश्चीत केला. उपांत्यपूर्व फेरीत दिपीकासमोर कोरियाच्या अॅन सॅनचं आव्हान असणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता ही मॅच सुरु होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT