केएल राहुलची वादळी खेळी, 150 धावा करत IPL मध्ये केला 'हा' मोठा विक्रम

मुंबई तक

K.L. Rahul : इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज के.एल राहुलने वादळी खेळी खेळत वैयक्तिक 150 धावा करत मोठा विक्रम केला आहे. आयपीएलमधील 150 धावा करणारा पहिला फलंदाज म्हणून त्याच्या नावे विक्रम झाला आहे.

ADVERTISEMENT

K.L. Rahul
K.L. Rahul
google news

बातम्या हायलाइट

point

150 धावा करणारा आयपीएलमधील टीम इंडियाचा पहिला फलंदाज 

point

पंजाब किंग्सला 265 धावांचे आव्हान

K.L. Rahul : इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज के.एल राहुलने वादळी खेळी खेळत वैयक्तिक 150 धावा करत मोठा विक्रम केला आहे. आयपीएलमधील 150 धावा करणारा पहिला फलंदाज म्हणून त्याच्या नावे विक्रम झाला आहे. त्याने केवळ 47 चेंडूत 102 धावा करत शतकी खेळी खेळली, तसेच 12 धावांवर असताना त्याने मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर वापर करत फायदा केला.

हे ही वाचा : 16 वर्षीय मुलाचं पोट फाडून गळा चिरला, भर लग्नसोहळ्यात रक्ताचा सडा, मृतदेह शेतात फेकला अन्... भयंकर कांड

सुरुवातीला त्याने केवळ डावाच्या तिसऱ्या षटकांत, अर्शदीप सिंगने गोलंदाजीच्या जोरावर शशांक सिंगने डीप स्क्वेअर लेगला राहुलचा झेल सोडला आणि एक चौकार सोडला. त्यानंतर राहुलने मागे न पाहता आपली खेळी सुरु ठेवली. 

शतकादरम्यान, त्याने 12 चौकार आणि पाच षटकारांसह मैदानावरील चारही दिशेने फटकेबाजी करत सावध पावित्रा घेतला. सुरुवातीपासून त्याचा आक्रमक पावित्र्याने गोलंदाजांचा धुव्वा उडवला होता. के. राहुल हा सहावा आयपीएलमधील शतक करणारा खेळाडू आहे. 

150 धावा करणारा आयपीएलमधील टीम इंडियाचा पहिला फलंदाज 

आयपीएलमध्ये 150 हून अधिक धावा करणारा के. एल. राहुल हा तिसरा फलंदाज आहे. मात्र, टीम इंडियामध्ये 150 धावा करणारा आयपीएलमधील तो पहिला फलंदाज ठरलेला आहे. मॅकुलमने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना नाबाद 158 धावा केल्या होत्या. तस 2013 मध्ये ख्रिस गेलने पंजाब किंग्सकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध 175 धावा केल्या होत्या. 

हे वाचलं का?