16 वर्षीय मुलाचं पोट फाडून गळा चिरला, भर लग्नसोहळ्यात रक्ताचा सडा, मृतदेह शेतात फेकला अन्... भयंकर कांड
crime news : लग्न समारंभात एका किशोरवयीन मुलाची धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली. ही घटना पटना ग्रामीण परिसरातील खुसरुपुर ठाणे परिसरातील आहे. शनिवारी सकाळी पडीक शेतात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याला रात्री उशिराने लग्नसमारंभात शेवटचे पाहिले गेले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
किशोरवयीन मुलाच्या पोटावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करत संपवलं
दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळला
Crime News : बिहारच्या पाटना जिल्ह्यात एका 16 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. लग्न समारंभात निष्पाप किशोरवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केल्याची माहिती समोर आली. ही घटना पटना ग्रामीण परिसरातील खुसरुपुर ठाणे परिसरातील आहे. शनिवारी सकाळी पडीक शेतात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याला रात्री उशिराने लग्नसमारंभात शेवटचे पाहिले गेले होते. हत्या करण्यात आलेल्या तरुणाची ओळख अंकित कुमार अशी निर्माण झाली.
हे ही वाचा : काका अशी ओळख सांगून, 6 वर्षीय मुलीला घरात फसवून नेले नंतर नको तेच... लाज आणणारी घटना
अंकित पाटनाच्या फतुहा येथील खासगी कंपनीत वडिलांसोबत काम करत होता. तो शुक्रवारी गावातील एका लग्नसमारंभासाठी घरी आला. एका पडीक जागेत मृतदेह आढळून आल्याची माहिती समजताच, खुसरुपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवच्छेदनासाठी पाठवला. अंकितच्या मृत्यूमुळे कुटुंबात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
किशोरवयीन मुलाच्या पोटावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करत संपवलं
पोलिसांच्या माहितीनुसार, किशोरवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करत पोटात आणि मानेवर वार करण्यात आले. पाटना ग्रामीण पोलीस अधीक्षक कुंदन कुमार यांनीही शनिवारी घटनास्थळाची पाहणी करत प्रकरणाचा सविस्तर तपास केला. अंकितच्या हत्येमागे हेतू अद्याप स्पष्ट झाला नाही. ही हत्या प्रकरणातून झाली असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळला
कुटुंबियांच्या म्हणण्यांनुसार, अंकित शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 12 वाजेपर्यंत लग्नाच्या ठिकाणी होता. नंतर तो त्या ठिकाणाहून अचानकपणे गायब झाला. त्या रात्री तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांना काळजी वाटू लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाल्यांचं चित्र आहे.









