विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये सचिनचा रेकॉर्ड तोडण्याची होती संधी 

मुंबई तक

Virat Kohli Retired : विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केली नसती तर सचिन तेंडुलकरचा मोडला असता रेकॉर्ड.

ADVERTISEMENT

Virat Kohli Retired News Update
Virat Kohli Retired News Update
google news

बातम्या हायलाइट

point

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर.

point

कसोटीत निवृत्ती जाहीर केली नसती तर सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड ब्रेक केला असता.

Virat Kohli Retired : रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाची रनमशीन म्हणून नावारुपाला आलेल्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.  14 वर्षांच्या कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा देत त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने मैदानावर निस्वार्थी खेळ दाखवला. त्याने अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले आहेत. मात्र, त्याला न मोडता आलेल्या विक्रमाची माहिती जाणून घेऊयात. 

हेही वाचा : Maharashtra SSC Board Result 2025: मोठी बातमी, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, 'या' दिवशी पाहता येईल निकाल

विराट कोहलीने 17 कसोटी सामन्यात 1 हजार 96 रन्स केल्या आहेत. तर दुसरीकडे क्रिकेटचा देव अशी ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरने 30 इनिंग्समध्ये 1 हजार 575 धावा केल्या होत्या. या तुलनेत सचिन तेंडुलकरच्या अधिक धावा आहेत. 

वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडूची उत्कृष्ट बॅट्समन अशी ओळख निर्माण होते. वनडे क्रिकेटमध्ये विराटने चांगली कामगिरी केली. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला वनडेच्या तुलनेत म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. त्याने कसोटीमध्ये 10 हजारांहून कमी धावा केल्या आहेत. 

हे वाचलं का?