वर्ल्ड कप विजेत्या स्टार खेळाडूच्या मुलीची अडल्ट प्लॅटफॉर्मवर एन्ट्री, जाणून घ्या कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Star player’s Daughter Join adult platform :देशात असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांच्या मुलांनी देखील त्याच क्षेत्रात करीअर करण्याचे स्वप्न पाहिले. याला काही खेळाडूंची मुले नक्कीच अपवाद असतील. मात्र या घटनेत एक विचित्रच घटना समोर आली आहे. एका वर्ल्ड कप विजेत्या स्टार खेळाडूच्या मुलीने अडल्ट प्लॅटफॉर्मवर (adult platform) एन्ट्री मारली आहे.या इड्स्ट्रीत आता तिने करीअर करण्याचे स्वप्न पाहिलंय. त्यामुळे स्टार खेळाडूच्या मुलीने अडल्ट प्लॅटफॉर्मवर काम करण्याचा निर्णय़ का घेतला, असा प्रश्न फॅन्सना पडला आहे. नेमका हा स्टार खेळाडू कोण आहे? व त्याच्या मुलीने हा निर्णय का घेतला? हे जाणून घेऊयात. (world cup winning star player daughter entry on adult platform know the reason)

ADVERTISEMENT

अडल्ट प्लॅटफॉर्म (adult platform) जॉईन करणाऱ्या या मुलीचे नाव डेनियल फवात्तो आहे. ही 25 वर्षीय तरूणी इन्फलूएन्सर (Influencer) आहे. डेनियलच्या वडिलांचे नाव रोमारीओ आहे. रोमारीओ हे ब्राझीलचे प्रसिद्ध फुटबॉलर (Footballer)आहेत. रोमारीओ यांनी आपल्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकला होता. या कामगिरीमुळे त्यांची प्रसिद्धी खुप वाढली होती. याच फुटबॉलरच्या मुलीने आता अडल्ट प्लॅटफॉर्मवर एन्ट्री मारली आहे. त्यामुळे पुन्हा रोमारीओ चर्चेत आले आहेत.

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर टीम इंडियाचा WTC चा प्रवास खडतर, जाणून घ्या समीकरण

हे वाचलं का?

अडल्ट प्लॅटफॉर्मवर का आली?

डेनियलने काही महिन्यांपुर्वीच एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे ती आता आई झाली आहे. तिचे पती फाबियो एनरिक हे देखील एक फुटबॉलर आहेत. सध्या ते एटलेटिका कॅटरिनीज क्लबसाठी खेळतायत. सर्व काही सुरळीत असताना डेनियलने अडल्ट कंटेंटसाठी (adult Content) चर्चेत असणाऱ्या एका वेबसाईटवर अकाऊंट उघडले आहे. या प्लॅटफॉर्मवर येताच तिने तिचे कंटेंट सर्वांत हटके असणार असल्याची घोषणा केली आहे.

डेनिअल काय म्हणाली?

अडल्ट प्लॅटफॉर्मवर (adult platform) एन्ट्री करण्याबाबत डेनिअल म्हणते की, मी माझे आई बनण्याचे अनुभव शेअर करण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल बनवली आहे. मला मुल हवं नव्हतं, पण मी माझे मन बदललं आणि अखेर आई होण्याचा निर्णय़ घेतला. ती पुढे म्हणते, मला माहित नव्हतं लहान मुलांशी कसे वागायचे आहे. मी अशी व्यक्ती होते, जी विमानात मुलं जरी रडली तरी मला खुप त्रास व्हायचा. या विषयावर व्हिडिओ बनवण्यासाठी मी या प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल बनवली आहे.

ADVERTISEMENT

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे? जाणून घ्या

ADVERTISEMENT

आई होण्याच्या अनुभवाबाबत म्हणते?

मी गर्भनिरोधक गोळ्या घेण बंद केले होते, त्यामुळे मी कमी वेळातच गर्भवती झाले होते. आई होणे हे माझ्यापेक्षा माझ्या बॉयफ्रेंडच स्वप्न होते. आठ वर्ष गर्भनिरोधक गोळ्या खाल्यानंतर मी ब्रेक घेतला आणि गोळ्या खाण बंद केले. आणि विचार केला मुलं हव आहे की नको? अखेर माझा निर्णय झाला आणि मी गर्भवती झाले. विशेष म्हणजे मी वास्कोच्या फुटबॉल मॅचच्या वेळी याबाबत माहिती दिली होती, त्यानंतर त्याच दिवशी वास्को क्लब जिंकला होता.

दरम्यान डेनिअल सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर व्हिडिओ फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर तिचे 2 लाख फॉलोवर्स आहेत. आता ती अडल्ट प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करणार आहे. या तिच्या व्हिडिओची फॅन्सना उत्सुकता असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT