Odi World Cup 2023 : टीम इंडियाने रचला इतिहास! ‘अशी’ कामगिरी करणारा बनला दुसरा देश

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

world cup 2023 team india becomes second most winning successful team ind vs eng match
world cup 2023 team india becomes second most winning successful team ind vs eng match
social share
google news

Ind vs Eng, Odi World Cup 2023 : भारतात सूरू असलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने (Team India) रविवारी इंग्लंडचा (England) पराभव करून सलग सहाव्या विजयाची नोंद केली. या विजयासह टीम इंडियाने आपलं सेमी फायनलमधील स्थानही पक्क केलं आहे. वर्ल्ड कपला मधला हा टीम इंडियाचा 59 वा विजय होता. हा विजय मिळवून टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्यात न्युझीलंडला पछाडतं दुसरं स्थान मिळवलं आहे. तर पाच वेळची वर्ल्ड कप विजेती असलेली ऑस्ट्रेलिया 73 विजयासह पहिल्या स्थानी आहे. (world cup 2023 team india becomes second most winning successful team ind vs eng match)

ADVERTISEMENT

भारताने न्युझीलंडला पछाडलं

टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत वर्ल्ड कपमध्ये 59 वा सामना जिंकला. हा सामना जिंकून टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विजयात न्युझीलंडला पछाडतं दुसरं स्थान पटकावलं. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन संघ 73 विजयासह पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया, भारतानंतर आता 58 सामने जिकूंन तिसऱ्या स्थानी न्युझीलंड आहे. यानंतर इंग्लंडने 50 सामने, पाकिस्तानने 47 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी 43 सामने जिंकले आहेत.

हे ही वाचा : Crime : शेती करताना मालकासोबतच जुळले सूत, वहिनीच्या विवाहबाह्य संबंधामुळे दिराचा गेला जीव

दरम्यान वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयाची टक्केवारी दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कपमधील भारताची विजयाची टक्केवारी 65.56 आहे आणि या यादीत ते दक्षिण आफ्रिका (61.43 टक्के) वर आहेत आणि ऑस्ट्रेलियन संघ (73 टक्के) मागे आहेत.

हे वाचलं का?

असा रंगला सामना

लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करावी लागणार होती. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरूवातीला भेदक गोलंदाजी करत टीम इंडियाला दबाव टाकला. या दबावातून शुबमन गिल 9, विराट शुन्य धावावर आऊट झाला. एका बाजूने टीम इंडियाचे विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने रोहित शर्माने टीचून फलंदाजी करत होता. यावेळी रोहितला राहुलची साथ मिळाली. मात्र तोही 39 धावावर बाद झाला. त्यानंतर उतरलेल्या सुर्याने त्याच्यासोबत पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला. मात्र चांगला लयीत असलेला रोहित शर्मा शतका पासून 13 धावा दुर असताना 87 वर आऊट झाला. आणि इथेच भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. शेवटी सुर्या देखील 49 धावा करून आऊट झाला आणि टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 229 धावा केल्या.

हे ही वाचा : Andhra Pradesh Train Accident: रेल्वे धडकल्या… 13 प्रवाशांचा मृत्यू, भयंकर अपघाताचं कारण आलं समोर

इंग्लंडसमोर 230 धावांचे सोप्प आव्हान होते. इंग्लंड सहज हे आव्हान पुर्ण करेल अशी परिस्थिती होती. मात्र टीम इंडियाच्या बॉलर्सने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा स्वप्नभंग केला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांवर भेदक मारा करत झटपट विकेट घेतले. ज्यामुळे इंग्लंड पुर्णत बॅकफुटवर गेली.त्यानंतर मिडल ओव्हर्समध्ये चायनामन कुलदीप यादव आणि सर जड्डू या जोडीने फिरकीची जादू दाखवत इंग्लंडला पुर्णत गुंडाळले आणि 129 धावात रोखले. आणि अशाप्रकारे भारताने 100 धावांनी हा सामना जिंकला.

ADVERTISEMENT

टीम इंडियाकडून शमीने 4, बुमराह 3, कुलदीपने 2 आणि जडेजाने 1 विकेट घेतला. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सहाव्या विजयाची नोंद केली आहे. तसचे टीम इंडियाचं सेमी फायनलमधील स्थानही पक्क झालं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT