”बंद करा तो टीव्ही…”, टीम इंडिया झाली सोशल मीडियावर ट्रोल
टीम इंडियाचे खेळाडू एका पाठोपाठ बाद होऊ लागल्यानंतर सोशल मीडियावरुन भारतीय संघावर मीम्सचे वादळ सुरु झाले. यावेळी श्रेयस अय्यरच्या फलंदाजीवरुन सोशल मीडियावरुन त्याला ट्रोल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

India vs Australia World cup Final 2023 Viral Memes: भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (Ind Vs Aus) आज अंतिम सामना (Final Match) होत आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. सामन्याआधी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कमिन्सला जोरदारपण प्रत्युत्तर
रोहित शर्माने या सामन्यात पुन्हा एकदा शानदार फलंदाजी करत टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करुन दिली होती. त्याने दुसऱ्याच षटकात 2 चौकार मारून पॅट कमिन्सला तेवढ्याच जोरदारपण प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रोहितने 31 चेंडूमध्ये 47 धावांची शानदार खेळी केली.
Pat Cummins saved his best delivery of the tournament for Shreyas Iyer.
— Silly Point (@FarziCricketer) November 19, 2023
श्रेयस अय्यर तंबूत
या सामन्यात टीम इंडियाची पहिली विकेट शुबमन गिलची गेली. शुभमनने 4.2 षटकात 30 धावा झाल्या असताना तो बाद झाला. यावेळी रोहित जबरदस्त जोमात दिसत होता. त्यावेळी त्याने भारताची धावसंख्या 76 वर नेऊन ठेवली होती. भारताची 76 धावसंख्या झालेली असतानाच 81 वर भारताचा तिसरा धक्का बसला आणि श्रेयस अय्यर तंबूत परतला.










