CWG 2022: भारतीय खेळाडूंची ‘सुवर्ण’ कामगिरी; राष्ट्रकुलमध्ये पदकतालीकेत पाचव्या क्रमांकावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games 2022) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. स्पर्धा सुरु झाल्यापासून नवव्या दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी भारताने एकूण 14 पदकं जिंकली, ज्यात चार सुवर्ण, तीन रौप्य आणि सात कांस्यपदकांचा समावेश आहे. इतकंच नाही तर क्रिकेट, टेबल टेनिस, बॉक्सिंग, हॉकी यांसारख्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून पदकांची निश्‍चिती केली आहे.

कुस्तीमध्ये मिळवली सहा पदकं

शनिवारी भारतीय कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करत तीन सुवर्ण आणि तब्बल कांस्यपदकं पटकावली आहेत. कुस्तीपटू रवी कुमार दहियाने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. रवी दहियाने अंतिम सामन्यात तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर नायजेरियाच्या ई. विल्सनचा 10-0 असा पराभव केला.

कुस्तीपटू विनेश फोगटबद्दल सांगायचे तर, त्याने नॉर्डिक प्रणाली अंतर्गत आयोजित 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे, नवीनने 74 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. याशिवाय पूजा गेहलोत, दीपक नेहरा आणि पूजा सिहाग यांनीही कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पॅरा टेबल टेनिसमध्ये भावीनाला सुवर्ण

पॅरा टेबल टेनिसमध्येही भारताचा दबदबा दिसून आला. भाविना पटेलने महिला एकेरीत सुवर्ण तर सोनलबेन मनुभाई पटेलने कांस्यपदक जिंकले. टोकियो पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेत्या भाविनाने अंतिम फेरीत नायजेरियाच्या ख्रिस्तियाना इक्पेओईचा 12-10, 11-2, 11-9 असा पराभव केला. दुसरीकडे, 34 वर्षीय सोनलबेनने कांस्यपदकाच्या प्ले-ऑफमध्ये इंग्लंडच्या स्यू बेलीचा 11-5, 11-2, 11-3 असा पराभव केला.

बॉक्सिंगमध्ये तीन कांस्य, तीन खेळाडू अंतिम फेरीत

बॉक्सिंगमध्ये जास्मिन लांबोरिया, मोहम्मद हुसामुद्दीन, रोहित टोकस यांना आपापल्या वजनी गटांच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे या तीन खेळाडूंना केवळ कांस्यपदक जिंकता आले. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे निखत झरीन, नीतू गंगास, अमित पंघल आणि सागर अहलावत यांनी अंतिम फेरी गाठली आहे, त्यामुळे त्यांचे रौप्यपदक जिंकणे निश्चित आहे.

ADVERTISEMENT

लॉन बॉल आणि ऍथलेटिक्समध्येही पदकं

लॉन बॉल्सच्या पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत टीम इंडियाने रौप्य पदक जिंकले आहे. अंतिम फेरीत सुनील, नवनीत, चंदन आणि दिनेश यांच्या नेतृत्वाखालील संघाचा उत्तर आयर्लंडकडून पराभव झाला आहे. दुसरीकडे, प्रियांका गोस्वामीने 10 किमी चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. प्रियांकाने हे अंतर 43 मिनिटे 38.82 सेकंदात पूर्ण केले. त्याचवेळी अविनाश मुकुंद साबळेने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले.

ADVERTISEMENT

पदकतालिकेत भारताची सध्याची परिस्थिती

आठव्या दिवशी भारताने एकूण 14 पदके जिंकली, तरीही भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 11 रौप्य आणि 16 कांस्य पदकं आहेत. ऑस्ट्रेलिया 59 सुवर्ण, 46 रौप्य आणि 50 कांस्यांसह पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, यजमान इंग्लंड 50 सुवर्ण पदकांसह दुसऱ्या तर कॅनडा 22 सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे, तर भारताच्या 5 स्थानावर आहे.

टेबल टेनिसमध्ये दोन पदकं निश्चित

टेबल टेनिसमध्ये शरथ कमल आणि जी साथियान या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच, अचंत शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत आपले पदक निश्चित केले आहे. मात्र, मनिका बत्रा आणि दिया चितळे यांना महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत यांनी एकेरीच्या सामन्यांची उपांत्य फेरी गाठली.

हॉकी-क्रिकेटमध्येही पदक निश्चित

क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने इंग्लंडचा चार धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दुसरीकडे, भारताच्या पुरुष हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. ऍथलेटिक्समध्ये, भारतीय महिला संघ 4×100 मीटर रिलेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT