ड्रेसिंग रुममधील मतभेदांमुळे Virat Kohli ने कर्णधारपद सोडलं? रवी शास्त्रींचे सूचक संकेत

आगामी न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत रोहित शर्माकडे भारताचं नेतृत्व
ड्रेसिंग रुममधील मतभेदांमुळे Virat Kohli ने कर्णधारपद सोडलं? रवी शास्त्रींचे सूचक संकेत
फोटो सौजन्य - Getty Images

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. विराट कोहलीचा हा कर्णधार म्हणून अखेरचा टी-२० वर्ल्डकप होता. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी विराटने आपला हा निर्णय जाहीर केला होता. विराटच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतू भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर महत्वाचं विधान केलं आहे.

ड्रेसिंग रुममधील मतभेदांमुळे Virat Kohli ने कर्णधारपद सोडलं? रवी शास्त्रींचे सूचक संकेत
T20 World Cup : ICC स्पर्धा न जिंकल्याचं दुःख आहेच पण पश्चाताप नाही - माजी प्रशिक्षक रवी शास्त्री
मला वाटत नाही की हे कारण असेल, कधीकधी ड्रेसिंग रुममध्ये लोकांचं एकमेकांशी पटत नाही. पण अशावेळी एकाला या सर्व गोष्टी मागे ठेवून पुढे निघावं लागतं. मग तो मी असेन किंवा तो असेल...पण ज्यावेळी गोष्टी खरंच जुळून येत नसतील अशावेळी एकाने पुढाकार घेऊन संघाला कोणताही धोका पोहचणार नाही ही खबरदारी घेत पुढे जाणं हेच योग्य आहे.
रवी शास्त्री - भारताचे माजी प्रशिक्षक

विराट कोहलीने आपलं कर्णधारपद सोडताना वर्कलोड मॅनेजमेंटचं कारण दिलं होतं. टी-२० विश्वचषकाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर रोहित शर्मा आगामी न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. याचसोबत रवी शास्त्री यांचा कार्यकाळही संपुष्टात आला असून राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच झाला आहे. विराट कोहली न्यूझीलंड दौऱ्यात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दाखल होईल.

ड्रेसिंग रुममधील मतभेदांमुळे Virat Kohli ने कर्णधारपद सोडलं? रवी शास्त्रींचे सूचक संकेत
अति क्रिकेट आणि Bio Bubble मुळे टीम इंडियाचा T20 World Cup मध्ये पराभव? रवी शास्त्री म्हणतात...

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in