VIVO कंपनी IPL ची साथ सोडणार, BCCI नवीन स्पॉन्सरच्या शोधात - Mumbai Tak - vivo exit as ipl title sponsor unacademy and dream11 in contention for 2021 season - MumbaiTAK
स्पोर्ट्स

VIVO कंपनी IPL ची साथ सोडणार, BCCI नवीन स्पॉन्सरच्या शोधात

गेल्या काही वर्षांपासून IPL आणि VIVO या मोबाईल कंपनीचं नातं आता संपुष्टात आलेलं आहे. कारण आयपीएल २०२१ साठी बीसीसीआयने VIVO सोबतचा करार रद्द करण्याचं ठरवलंय. भारत आणि चीन यांच्यात २०२० मध्ये डोकलाम सीमेवर झालेल्या संघर्षात १६ भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर भारतात चिनी वस्तूंविरोधात वातावरण तयार झालं. ज्याचा फटका बीसीसीआयलाही बसला. आयपीएलचं […]

गेल्या काही वर्षांपासून IPL आणि VIVO या मोबाईल कंपनीचं नातं आता संपुष्टात आलेलं आहे. कारण आयपीएल २०२१ साठी बीसीसीआयने VIVO सोबतचा करार रद्द करण्याचं ठरवलंय. भारत आणि चीन यांच्यात २०२० मध्ये डोकलाम सीमेवर झालेल्या संघर्षात १६ भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर भारतात चिनी वस्तूंविरोधात वातावरण तयार झालं. ज्याचा फटका बीसीसीआयलाही बसला. आयपीएलचं प्रमुख स्पॉन्सरशीप असलेल्या VIVO या मोबाईल कंपनीसोबतचा करार बीसीसीआयला स्थगित करावा लागला होता. २०१८ साली बीसीसीआय आणि VIVO यांच्यात करार झाला होता. ज्यासाठी VIVO कंपनी प्रत्येक सिझनसाठी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती.

परंतु आयपीएल २०२० साठी देशात चीनविरोधी वातावरण पाहता बीसीसीआयने करार एक वर्षासाठी रद्द करत Dream 11 ला स्पॉन्सरशीपचे हक्क दिले. २२२ कोटी रुपये मोजत Dream 11 ने IPL 2020 च्या स्पॉन्सरशीपचे हक्क विकत घेतले होते. Outlook ने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२१ साठी VIVO कंपनी आपला करार दुसऱ्या ब्रँडच्या नावावर ट्रान्स्फर करण्याच्या तयारीत आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील संघर्ष पहिल्यासारखे होण्याची चिन्ह दिसत नसल्यामुळे VIVO ने आयपीएल २०२१ ला स्पॉन्सरशीप देण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही पीटीआयशी बोलताना VIVO कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. “VIVO सोबतचा करार आता जवळपास संपुष्टात आला आहे. बोर्ड आणि कंपनीने सहमतीने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय आणि VIVO यांच्यात २०१८ साली झालेल्या करारात आपले स्पॉन्सरशीपचे हक्क दुसऱ्या कंपनीला विकण्याचा एक क्लॉज आहे. येत्या काही दिवसांत BCCI ने याला परवानगी दिल्यास ही प्रक्रीया लवकर पार पडली जाईल.”

अवश्य वाचा – मराठमोळा माजी क्रिकेटर करणार विराटच्या RCB ला मदत

Dram 11 आणि Unacademy हे दोन ब्रँड सध्या आयपीएलच्या २०२१ च्या स्पॉन्सरशीपसाठी शर्यतीत आहेत. Unacademy हा ब्रँड सध्या आयपीएलचा असोसिएट स्पॉन्सर असून त्यांनी VIVO ने आपले हक्क सोडल्यास सर्वाधिक बोली लावण्याची तयारी केली आहे. आयपीएल २०२० प्रमाणे बीसीसीआय स्पॉन्सरशीपसाठी नव्याने टेंडर मागवू शकतं, असं केल्यास बीसीसीआयला गेल्या हंगामात लावण्यात आलेल्या २२२ कोटींपेक्षा जास्त रक्कम नक्कीच मिळेल. पण VIVO देत असलेल्या ४४० कोटींची रक्कम बीसीसीआयला मिळणार नाही. अशा परिस्थितीत VIVO आपले हक्क सोडून दुसऱ्या कंपनीला देणार असल्यास बीसीसीआयला VIVO ने लावलेल्या बोलीइतकी म्हणजेच ४४० कोटींची रक्कम मिळू शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + seven =

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. दररोज Squats करा; मिळतील ‘हे’ 7 अप्रतिम फायदे! फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली ‘ही’ ठिकाणं करा Explore रम आणि ब्रँडीमध्ये ‘हा’ आहे फरक… ‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर! Team India सोबत विमानात कोण होती ती ‘मिस्ट्री गर्ल’, पाहा PHOTO सनी देओल दिसला दारूच्या नशेत, व्हिडीओ व्हायरल… ‘Animal’ मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का? Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss Weight Loss: महिन्याभरातच कसं व्हायचं स्लिम-फिट? दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन! गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा ‘या’ छोट्या टिप्स… डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये? तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त ‘या’ 3 गोष्टी नेहमी करा फॉलो! Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात