Happy Birthday Rahul Dravid : शांत द्रविडला राग येतो तेव्हा काय होतं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rahul Dravid Birthday: आज (11 जानेवारी) भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा वाढदिवस आहे. द वॉल या नावाने प्रसिद्ध असलेला द्रविड 50 वर्षांचा झाला आहे. क्रीडा जगतातील दिग्गजांसह चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 1973 मध्ये इंदूरमध्ये जन्मलेल्या द्रविडची स्वतःची एक वेगळी शैली आहे आणि तो त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. पण द्रविडलाही रागही येतो हे चाहत्यांना माहीत आहे का? ‘दीवार’ आणि ‘मिस्टर ट्रस्टवर्दी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला एकदा पाकिस्तान दौऱ्यावर प्रचंड राग आला होता. हा राग पत्रकार परिषदेदरम्यान आला, जेव्हा द्रविडने एका पत्रकाराला बाहेर काढण्यापर्यंत मजल मारली होती.

ही घटना 2004 मध्ये भारतीय संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर घडली होती. त्यानंतर कसोटी मालिकेत द्रविडची बॅट जबरदस्त होती आणि त्याने 3 सामन्यांच्या 4 डावात 309 धावा केल्या. याच पाकिस्तान दौऱ्यावर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने मॅच फिक्सिंगबाबत प्रश्न केला होता.

मॅच फिक्सिंगच्या प्रश्नावर द्रविडला राग आला

यावर टीम इंडियाचा दीवार म्हटला जाणारा राहुल द्रविड चांगलाच संतापला. तेव्हा द्रविड जाहीरपणे म्हणाला, ‘या व्यक्तीला (रिपोर्टर) कोणीतरी बाहेर काढा. हा मूर्खपणा आहे आणि अशा गोष्टी खेळासाठी वाईट आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इंग्लंड दौऱ्यावर दुसऱ्यांदा संतापला होता द्रविड

द्रविडला राग येण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही. यानंतर 2006 मध्ये एकदा राहुल द्रविड चांगलाच चिडला होता. ही घटना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान घडली. त्या मालिकेत द्रविड संघाचा कर्णधार होता. यादरम्यान इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला होता. या पराभवामुळे संतप्त झालेल्या द्रविडने ड्रेसिंग रूममध्ये खुर्ची फेकली. खरे तर त्या विजयासह इंग्लंड संघाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता आली. अशा स्थितीत द्रविडला पराभव सहन झाला नाही आणि तो संतापला.

राहुल द्रविडची क्रिकेट कारकीर्द

164 कसोटी सामने – 13288 धावा – 36 शतके – 63 अर्धशतक

ADVERTISEMENT

344 एकदिवसीय सामने – 10889 धावा – 12 शतके – 83 अर्धशतक

ADVERTISEMENT

एक T20 आंतरराष्ट्रीय सामने – 31 धावा

द्रविडने गांगुलीसोबत पदार्पण केले

राहुल द्रविड आणि दुसरा माजी कर्णधार सौरव गांगुली या दोघांनी 1996 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केले. गांगुलीने पहिल्या कसोटी डावात शतक झळकावले, तर द्रविडचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. परंतु 2002 मध्ये, द्रविडने सलग चार कसोटी शतके झळकावली, ज्यात हेडिंग्ले येथे कठीण परिस्थितीत 148 धावांचा समावेश आहे.

टीम इंडियाचे फक्त दोनच फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त, द्रविडने 13,288 कसोटी धावा केल्या आहेत. ज्यात 36 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. द्रविडने वनडेमध्ये 10,889 धावा केल्या आहेत. ज्यात त्याच्या 12 शतकांचा समावेश आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT