MCA चा सिंह कुणाच्या दावणीला? शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जबरदस्त चुरस

२८ सप्टेंबरला रंगणार आहे MCA अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक
Why is the election of Mumbai Cricket Association in discussion?
Why is the election of Mumbai Cricket Association in discussion?

एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशन सध्या चांगलंच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे २८ सप्टेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनचं नवीन पॅनल निवडण्यासाठी निवडणूक घोषित करण्यात आली आहे. मनोहर जोशी, विलासराव देशमुख, शरद पवार, आशिष शेलार अशा दिग्गज राजकारण्यांनी एमसीएचं अध्यक्षपद भूषवलं आहे. एमसीएचं अध्यक्षपद हे अत्यंत मानाचं समजलं जातं. आर्थिक उलाढालीचं केंद्र असणाऱ्या एमसीएवर अनेक दिग्गजांचा डोळा असतोच. या निवडणुकीकडे देवेंद्र फडणवीसांचंही लक्ष असणार आहे.

Why is the election of Mumbai Cricket Association in discussion?
MCA Election 2022: 'वानखेडे ते पवार' असे आहेत क्रिकेटच्या पीचवर उतरलेले राजकीय नेते

२८ सप्टेंबरला होणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक

२०२२ च्या या निवडणुकीत पवारांसोबतच,फडणवीस, ठाकरे या दिग्गज राजकारण्यांनी उडी मारली आहे. मात्र हे सगळे राजकारणी पडद्यामागून सूत्रं हलवणार आहेत. कारण लोढा कमिटीच्या शिफारशीमुळे राजकारणी मंडळींना थेट निवडणुकीत उतरता येणार नसलं तरी आपली माणसं निवडणुकीत उतरवून एमसीएची खुर्ची आपल्याकडेच ठेवण्यासाठी आता जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे... नेमकं काय आहे एमसीएचं राजकारण जाणून घेऊ.

खुर्ची आपल्याकडे वळवण्यासाठी दिग्गज प्रयत्नात

२८ सप्टेंबरला बहुचर्चित मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली आहे. आणि तेव्हापासून पडद्यामागच्या हालचालींना जबरदस्त वेग आलाय... आत्तापर्यंत आयसीसी,बीसीसीआय आणि एमसीएवर राजकारण्यांची हुकुमत होती. खेळातील सत्ताकेंद्रावर आपलीच गादी चालावी यासाठी दिग्गज राजकारण्यांनी आपलं राजकारणातले सगळे डावपेच खेळातही वापरून महत्वाच्या या पदांवर निवडणुका जिंकल्या होत्या मात्र लोढा कमिटीच्या शिफारशीनंतर खेळातील सत्ताकेंद्रावरील राजकारण्यांची सद्दी आता जवळपास संपुष्टात आलीय..

लोढा कमिटीच्या महत्वाच्या शिफारसी काय सांगतात?

१) ७० वर्षांवरील व्यक्ती तसंच मंत्री आणि नोकरशहांना मनाई

२) क्रिकेट प्रशासनात प्रत्येक व्यक्तीकडे एकच पद, त्यामुळे हितसंबंधाचा संघर्ष टाळता येईल

३) कोणत्याही पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त तीनच टर्म्स पद सांभाळता येईल

४) कोणत्याही पदाधिकाऱ्याला सलग दोनपेक्षा जास्त टर्म्स पदावर राहता येणार नाही

लोढा कमिटीच्या शिफारसींमुळे काय झालं?

आता या सगळ्या शिफारसींमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील दिग्गज दावेदार शरद पवार आणि आशिष शेलार हे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेत.. मात्र आपलीच माणसं या पदावर निवडली जावीत यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू आहेत.. मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये सध्या पवार गट,शेलार गट आणि जुना जाणता महादळकर गट यांच्यातच खरी चुरस आहे... भारताचे माजी खेळाडू संदीप पाटील हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. मागच्या वेळी त्यांना ही निवडणूक लढवता आली नव्हती मात्र यावेळी संदीप पाटील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. त्यांना जुन्या जाणत्या महादळकर गटाचा पाठिंबा मिळाला आहे.

MCA, which is the center of financial turnover, has an eye on many veterans
MCA, which is the center of financial turnover, has an eye on many veterans

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही निवडणुकीत पडद्यामागून उडी

तसंच या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील पडद्यामागून उडी घेतल्याचं चित्र आहे. कारण गणेशोत्सवात संदीप पाटील वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्याचा निवडणुकीत पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. दुसरीकडे शेलार गटाकडून एमसीएचे सध्याचे उपाध्यक्ष अमोल काळे यांना मैदानात उतरवण्याच्या प्रयत्नात आहेत.. अमोल काळे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे अमोल काळेंना निवडणुकीत जिंकवण्यासाठी पडद्यामागून फडणवीस आणि समोरून आशिष शेलार कसोशीचे प्रयत्न करत आहेत.

तिसऱ्या गटाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही

तिसरा गट शरद पवारांचा मात्र या निवडणुकीबाबत आपला अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याविषयी पवारांनी अजूनही आपले पत्ते उघडलेले नाहीत.. दरम्यान अमोल काळेंना सपोर्ट करण्यासाठी आशिष शेलारांनी सकाळीच सिल्वर ओकवर जाऊन पवारांची भेट घेतली.. आता पवार –शेलार गटाची हातमिळवणी होऊन अमोल काळे अध्यक्षपदाचे उमेदवार होतात... पवार संदीप पाटील यांना पाठिंबा देऊन महादळकर गटाला जवळ करून अमोल काळेंना म्हणजेच पर्यायाने फडणवीस-शेलारांना शह देतात.. किंवा राजकारणातील चाणक्याप्रमाणे पवार आपला तिसराच उमेदवार उभा करून निवडणुकीत वेगळाच रंग भरतात हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

मिलिंद नार्वेकरही उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

दरम्यान एमसीचे सध्याचे अध्यक्ष विजय पाटील आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू जवळचे मिलिंद नार्वेकरही मुंबई क्रिकेट असोसिएनशच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. मात्र राजकारणात भल्या भल्यांना धक्का देणारे शरद पवार आणि महाविकास आघाडीला सत्तेतून खेचून एकनाथ शिंदेंचं सरकार राज्यात आणणारे देवेंद्र फडणवीस यांच्यातच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत खरी चुरस असणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in