व्हीडिओ
आरोह वेलणकर का म्हणाला अजानमुळे त्याची झोपमोड होते?
वेळीअवेळी जोरजोरात होणाऱ्या अजानमुळे अभिनेता आरोह वेलणकरची झोप उडाली आहे,या विरोधात आरोह कायदेशीर कारवाई करण्याच्या पावित्र्यात
अभिनेता आरोह वेलणकरची सध्या झोप उडाली आहे. कोणत्याही कामामुळे,टेन्शनमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे अभिनेता आरोह वेलणकरला झोप लागत नाहीये. आरोह वेलणकर मुंबईत राहत असलेल्या बिल्डिंगमागे असलेल्या मशिदीमधून वेळीअवेळी जोरजोरात होणाऱ्या अजानमुळे त्याची सध्या झोप उडाली आहे. आरोहने बुधवारी भल्या सकाळी सोशल मिडीयावर याचा व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली. आरोहने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की माझ्या घराच्या मागे असलेल्या पठाणवाडी या भागातील मशिदीमधून कोणत्याही वेळी जोरजोरात अजानचे आवाज येत असतात, त्यामुळे आमच्या परिसरातील नागरिकांची झोपेच्या वेळी प्रचंड गैरसोय होते. याबद्दल मुंबई तकने अभिनेता आरोह वेलणकरशी खास बातचीत केली.