व्हीडिओ
Rajnath Singh : महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफी मागितली
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती की नाही, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. संरक्षणमंत्री आणि भाजपमधले मातब्बर नेते राजनाथ सिंह यांनीच या मुद्द्याला वाचा फोडलीय.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती की नाही, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. संरक्षणमंत्री आणि भाजपमधले मातब्बर नेते राजनाथ सिंह यांनीच या मुद्द्याला वाचा फोडलीय. राजनाथ सिंह यांनी सावरकरांनी गांधीजींच्या सूचनेवरूनच ब्रिटिशांकडे माफीनामा म्हणजेच दया याचिका केली होती, असं म्हटलं. आणि संरक्षणमंत्र्यांच्या याच विधानावरून आता नवा वाद निर्माण झालाय. हा नेमका वाद काय? सावरकरांनी खरंच ब्रिटिशांची माफी मागितली होती का? आणि त्यावर इतिहासकार काय म्हणतात, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया.