‘महिलेसोबत नको त्या अवस्थेत…’ एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना काय बोलले?| Jalgaon News
eknath shinde on girish mahajan fardapur rest house Jalgaon News

ADVERTISEMENT
eknath shinde on girish mahajan fardapur rest house Jalgaon News
काही वर्षांपूर्वी फर्दापूरच्या विश्रामगृहावर एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत कोण पकडलं गेलं होतं ? माझी चूक झाली मी त्यावेळेस त्यांना मोकळं सोडलं, मी तिथं पोहचलो म्हणून वाचले पोलिसांत अटक करवून दिली असती तर आज फायद्यात राहिला असतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडलं. शेकऱ्यांच्या कापूस प्रश्नावर आज जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भेट दिली. यावेळी खडसे यांनी गिरीश महाजन यांना पुन्हा लक्ष्य केले. मी कुणाल पकडलं नाही, चार भिंतीच्या आत कुणाशी तासंतास गप्पा मारत नाही, रेल्वे प्रवासात एसी फर्स्ट क्लासच्या बोगीत कुणाला सोबत घेऊन जाऊन प्रवास करत नाही. अशा शेलक्या भाषेत खडसेंनी महाजन यांच्या जमनेरात भिडून त्यांच्यावर टीका केली.
eknath shinde on girish mahajan fardapur rest house Jalgaon News