पंतप्रधान मोदींची सुरक्षा कुणी टाकली धोक्यात? आज तकच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींची सुरक्षा कुणी टाकली धोक्यात? आज तकच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा

5 जानेवारी 2022 मध्ये पंजाबच्या फिरोजपूरमधील सभेला जात असताना फ्लायओव्हरवर पंतप्रधान मोदी यांचा ताफा 15-20 मिनिटांसाठी थांबवण्यात आला, कारण समोर काही आंदोलक उभे होते. मात्र ही देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेतली सगळ्यात मोठी चूक होती. नियमानुसार पंतप्रधानांचा ताफा जात असताना अशाप्रकारे आंदोलक येऊ शकत नाहीत. त्यामुळे ही चूक नेमकी कुणाची? पंजाब सरकार की केंद्र सरकार? यावर आता सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली असून निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली तपास होणार आहे. पण त्याआधी 'आज तक'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा समोर आलेला आहे. 'आज तक'ची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये कोणता खुलासा समोर आलाय, पाहा खालील व्हीडिओमध्ये.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in