बीडमध्ये पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना झटका, नगरपंचायत निकालाचे 4 अर्थ

नगरपंचायत निवडणुकीत बीड जिल्ह्यातील निकालाने खळबळ उडवून दिलीय. 5 पैकी 3 नगरपंचायती जिंकत पंकजा मुंडेंनी बाजी मारलीय.

महाराष्ट्रातील १०६ नगरपंचायतींचा निकाल लागला. मुंडे भावाबहिणींमधला या निवडणुकीने वाद पुन्हा चव्हाट्यावर आला होता. सत्तेत असताना बीडसाठी कुणी किती पैसा आणला यावरून दोघांनी एकमेकांची औकात काढली होती. त्यामुळे बीडचे विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे बाजी मारतात की माजी पालकमंत्री पंकजा मुंडे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. बीड जिल्ह्यातील 5 नगरपंचायतमधील 85 जागांचा निकाल आला. यामध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या तीन नगरपंचायतींमध्ये पंकजा मुंडेंच्या भाजपनं एकहाती सत्ता मिळवली. या तिन्ही महत्त्वाच्या नगरपंचायतींमध्ये धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादीला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. केजमध्ये त्रिशंकू निकाल लागला.

Related Stories

No stories found.