शिवसेना दसरा मेळाव्याचा सस्पेन्स संपला! शिवाजी पार्क ठाकरेंना, शिंदेंना न्यायालयात झटका

shiv sena dasara melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेकडून परवानगी न मिळाल्यानं शिवसेनेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या...

मुंबईतल्या दादर भागात असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचाच आवाज घुमणार, हे स्पष्ट झालं. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला मात्र, झटका बसलाय. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली होती. शिवसेनेनं परवानगी मागितल्यानंतर शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनीही महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर महापालिकेनं दोन्ही अर्ज फेटाळून लावले होते.

Mumbai Tak
www.mumbaitak.in