Video: लोकसभेमध्ये अमोल कोल्हे-सुजय विखे पाटील आमनेसामने येतात तेव्हा...

गेल्या 21 महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनावर लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. अमोल कोल्हे आणि भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांनी सहभाग घेतला.

सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेमध्ये 2 आणि 3 डिसेंबरला कोरोनावर चर्चा झाली. साथ आल्यापासून 21 महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनावर लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. अमोल कोल्हे आणि भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युद्धशास्त्राच्या भाषेत कोरोनाविरुद्ध कसं लढायला हवं ते सांगितलं, तर सरकारची बाजू मांडताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी वैद्यक शास्त्राच्या भाषेत युक्तिवाद केला. लोकसभेत दोन मराठी डॉक्टर लढले, कोण जिंकलं?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in