रोहित पवार निघून गेले आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडत राहिले!

पोस्टरवर फोटो लावण्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. रोहित पवार यांच्या समोरच दोन गट आमने-सामने आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे शुक्रवारी धुळे दौऱ्यावर होते. शहरातील पारोळा रोडवरील प्रकाश टॉकीज चौकात त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर फोटो लावण्यावरून दोन गट आमनेसामने आले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा फोटो नसल्याने गोटे समर्थक आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यात रोहित पवार यांच्यासमोरच चांगली शाब्दिक चकमक झाली. दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये झटपट झाली. कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू असतानाच रोहित पवार घटनास्थळावरून काढता पाय काढला आणि वाहनात बसून निघून गेले. पवार निघून गेल्यावरही दोन गटांमध्ये झटपट सुरूच होती.

Mumbai Tak
www.mumbaitak.in