Astrology : मंगळ नक्षत्र परिवर्तन 2026, 'या' राशींसाठी प्रगती व लाभाचा सुवर्णकाळ सुरू होईल
मुंबई तक
• 12:50 PM • 11 Jun 2026
Astrology : मंगळ ग्रह 16 जून 2026 रोजी मेष राशी सोडून कृत्तिका नक्षत्रातून भ्रमण करत वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि कृत्तिका नक्षत्राचा संयोग अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी मानला जातो, तो अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, याचा काही राशीतील लोकांवर मोठा परिणाम जाणवेल.
ADVERTISEMENT


1/5
मंगळ ग्रह 16 जून 2026 रोजी मेष राशी सोडून कृत्तिका नक्षत्रातून भ्रमण करत वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि कृत्तिका नक्षत्राचा संयोग अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी मानला जातो, तो अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, याचा काही राशीतील लोकांवर मोठा परिणाम जाणवेल.


2/5
मेष
मेष राशीसाठी मंगळाचे संक्रमण आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. अडकलेला निधी परत मिळवण्याची आणि गुंतवणूकीतून चांगला नफा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात.
ADVERTISEMENT


3/5
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, कारण मंगळ ग्रह हा सूर्य ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करत आहे. भाग्य आपल्या बाजूने राहील, प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल.


4/5
वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी विशेषत: फायदेशीर ठरेल, कारण मंगळ ग्रह हा याच राशीचा स्वामी ग्रह आहे. आत्मविश्वास वाढेल आणि कठीण परिस्थितीला समोरे जाण्याची क्षमता अधिक बळकट होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढ होणार आहे.
ADVERTISEMENT


5/5
धनु
धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा नक्षत्र बदल शत्रूंवर विजय आणि यश घेऊन येतो. कायदेखशीर निर्णय अनुकूल असू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल आहे.
ADVERTISEMENT












