18 वर्षानंतर दरिद्र योग 'या' राशीतील लोकांना मिळणार आर्थिक पाठबळ, काही राशीतील लोकांचा खिसा रिकामाच राहणार
मुंबई तक
29 Jul 2025 (अपडेटेड: 29 Jul 2025, 09:30 AM)
Astrology : 17 ऑगस्ट रोजी सूर्य ग्रह हा सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे सूर्याचा केतू ग्रहाशी संयोग होऊन एक विशेष योग प्राप्त होईल, ज्याला दरिद्र योग निर्माण होणार आहे.
ADVERTISEMENT


1/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 17 ऑगस्ट रोजी सूर्य ग्रह हा सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे सूर्याचा केतू ग्रहाशी संयोग होऊन एक विशेष योग प्राप्त होईल, ज्याला दरिद्र योग म्हणतात.


2/5
दरिद्र योगामुळे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हा योग सर्व राशींवर परिणामकारक असणार आहे. पण यातील विशेषतः मेष, वृषभ, कर्क राशीच्या लोकांनी सावधानता बाळगावी, असे ज्योतिषशास्त्र सांगतं.
ADVERTISEMENT


3/5
मेष राशी
या योगामुळे मेष राशीतील लोकांना शारिरिक आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. गर्भवती असलेल्या महिलांनी विशेष काळजी घ्यावी.


4/5
वृषभ राशी
वृषभ राशीतील लोकांना आर्थिक समस्या निर्माण होईल. मानसिक आरोग्य बिघडेल, आईच्या आरोग्याची चिंता वाढेल, नोकरदारांच्या कामात अडथळे येऊ शकतात.
ADVERTISEMENT


5/5
कर्क राशी
कर्क राशीतील लोकांना डोळ्यांच्या आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. शनीच्या साडेसातीचा फेरा प्रभावी असल्याने अडथळे येण्याची शक्यता आहे. तथापि, बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे काही सकारात्मक योग देखील तयार होतील, ज्यामुळे चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
