Astrology : गुरूचा कर्क राशीत प्रवेश, हंस महापुरुष राजयोगाची निर्मिती; 'या' राशींचे भाग्य बदलेल
मुंबई तक
• 01:23 PM • 01 Jun 2026
Astrology : गुरू ग्रहाचा कर्क राशीत प्रवेश झाल्यास हंस महापुरुष राजयोग निर्माण होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, हा एक अत्यंत शुभ मानला जाणारा योग आहे, विशिष्ट राशींच्या व्यक्तींसाठी विशेषत: फायदेशीर ठरू शकतो. जाणून घ्या एकूण राशीचे भविष्य.
ADVERTISEMENT


1/6
गुरू ग्रहाचा कर्क राशीत प्रवेश झाल्यास हंस महापुरुष राजयोग निर्माण होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, हा एक अत्यंत शुभ मानला जाणारा योग आहे, विशिष्ट राशींच्या व्यक्तींसाठी विशेषत: फायदेशीर ठरू शकतो. जाणून घ्या एकूण राशीचे भविष्य.


2/6
2 जून 2026 रोजी, गुरु ग्रह हा त्याच्या उच्च राशी, कर्क राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे एक अत्यंत शक्तीशाली आणि शुभ परिस्थिती निर्माण होईल. या संक्रमाणाचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होईल.
ADVERTISEMENT


3/6
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आहे. नवीन भागीदारी होण्याची आणि मोठे व्यवहार पूर्ण होण्याची अधिक शक्यता आहे. नोकरदारांना चांगल्या संधी आणि नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.


4/6
कन्या
कन्या राशीसाठी हे संक्रमण शिक्षण आणि संपत्तीच्या क्षेत्रात विशेष लाभ घेता येईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेश प्रवासाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


5/6
धनु
धनु राशीसाठी हा काळ करिअर आणि प्रतिष्ठेत वाढ दर्शवतो. आत्मविश्वास वाढेल आणि कामाच्या ठिकाणी आदर वाढेल. याच काळात पदोन्नती किंवा पगारवाढीसारखे दीर्घकालीन प्रलंबित असणारे लाभ मिळण्याची शक्यता आहे.


6/6
मीन
मीन राशीसाठीचे हे संक्रमण सुखसोयी आणि मालमत्तेच्या बाबतीत सकारात्मक परिणाम देईल अशी अपेक्षा आहे. नवीन, घर किंवा जमीन खरेदीची संधी मिळेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT












