Astrology : पितृपक्षादरम्यान लक्ष्मी नारायण राजयोग, 4 राशींवर धनाचा वर्षाव

मुंबई तक

• 01:05 PM • 22 Sep 2026

Astrology : पितृपक्ष हा 27 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 10 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षीचा पितृपक्ष अत्यंत शुभ मानला जातो. पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच, शुक्र ग्रह हा स्वत:च्या राशीत म्हणजेच, तूळ राशीत प्रवेश करेल, जिथे बुद्धीचा ग्रह बुध आधीपासून उपस्थित असेल. तूळ राशीतील शुक्र ग्रह आणि बुध ग्रह यांच्या महायुतीमुळे लक्ष्मी - नारायण राजयोगाची निर्मिती होईल. याचा काही राशींना फायदा होणार आहे. 

Google CTA
Astrology

1/5

पितृपक्ष हा 27 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 10 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षीचा पितृपक्ष अत्यंत शुभ मानला जातो. पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच, शुक्र ग्रह हा स्वत:च्या राशीत म्हणजेच, तूळ राशीत प्रवेश करेल, जिथे बुद्धीचा ग्रह बुध आधीपासून उपस्थित असेल. तूळ राशीतील शुक्र ग्रह आणि बुध ग्रह यांच्या महायुतीमुळे लक्ष्मी - नारायण राजयोगाची निर्मिती होईल. याचा काही राशींना फायदा होणार आहे. 
 

Astrology

2/5

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण राजयोगाचा मोठा परिणाम होणार आहे. हा मोठा राजयोग राशीच्या पाचव्या घरात घडणार आहे. या राशीच्या लोकांना शेअर बाजार, ट्रेंडिंग किंवा गुंतवणूकीतून अपेक्षेहून अधिकचा नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती आणि अपेक्षित पगारवाढीची सकारात्मक बातमी मिळेल. कला, माध्यम, लेखन आणि डिझाइन या क्षेत्रांतील व्यक्तींना आपली प्रतिभा दाखवण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळेल. 
 

Astrology

3/5

तूळ 

लक्ष्मी राजयोग तुमच्या स्वराशीत तयार होणार आहे, ज्यामुळे शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह तुम्हाला पूर्ण शक्ती देतील. अचानकपणे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा एखादा व्यवसायिक करार निश्चित करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. 
 

Astrology

4/5

मकर 

मकर राशीच्या दहाव्या घरात शुक्र ग्रह आणि बुध ग्रहाची युती निर्माण झाली. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला मोठे पॅकेज दिले जाऊ शकेल. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा व्यवसायाशी संबंधित कंपन्यांमध्ये काम करतात, त्यांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो. 
 

Astrology

5/5

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती तयार होत आहे. या लोकांची प्रलंबित असलेली कामे लवकरच पूर्ण होतील. धार्मिक तीर्थयात्रा करणे शक्य होईल. तुम्हाला तुमच्या पूर्वजांकडून विशेष आशीर्वाद मिळतील. जे परदेशी व्यवसायात गुंतलेले आहेत आणि परदेशा कंपन्यांमध्ये काम करतात, त्यांच्यात लक्षणीय आर्थिक लाभ होईल. 
 

हे वाचलं का?