शनि आणि बुध ग्रहाची वक्री गती 'या' तीन राशीतील लोकांना आर्थिक सामना करावा लागणार, तुमच्या राशीचा समावेश आहे का?

मुंबई तक

• 09:30 AM • 15 Jul 2025

Astrology : जुलै 2025 मध्ये ग्रहांच्या हालचालीमध्ये मोठा बदल घडणार आहे. याच बदलामुळे काही राशीतील लोकांच्या समस्या निर्माण होतील, त्या नेमक्या कोणत्या राशी आहेत ते जाणून घ्या.

follow google news
Astrology

1/5

जुलै 2025 मध्ये ग्रहांच्या हालचालीमध्ये मोठा बदल घडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि आणि बुध यांच्या वक्री स्थितीत बदल होऊन प्रवेश करतील. या बदलामुळे काही राशीतील लोकांना समस्या निर्माण होतील. कोणत्या राशींना सावधगिरी बाळगावी लागेल आणि त्याचे इतर परिणाम काय होतील याबाबत जाणून घेऊयात.

Astrology

2/5

ज्योतिषशास्त्राच्या पंचांगानुसार, 13 जुलै रोजी शनि मीन राशीत वक्री झाला आहे. 18 जुलै 2025 रोजी बुध कर्क राशीमध्ये वक्री सुरु करेल. ज्योतिषशास्त्रात, शनि हा कर्माचा कारक मानला जातो. जो कृतीवर आधारीत फळ देईल. या ग्रहांच्या वक्री हालचालीमुळे अनेक राशींसाठी आर्थिक आणि वैयक्तिक समस्या येऊ शकतात. याचाच नेमक्या कोणत्या राशींवर परिणाम होणार हे ते जाणून घेऊयात.

Astrology

3/5

सिंह राशी

सिंह राशीतील लोकांसाठी हा काळ अगदी आव्हानात्मक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात तुम्हाला प्रत्येक निर्णय हा काळजीपूर्वक घ्यावा लागेल. घाईगडबडीत घेतलेला निर्णय त्रासदायक ठरू शकतात. विशेषत: पैशाचे व्यवहार टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. 
 

Astrology

4/5

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत आणि व्यवसायाबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या काळामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय घेताना विचार करावा, यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. 
 

Astrology

5/5

कुंभ राशी 

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खर्चात पाडणारा आहे. घरात नकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढण्याची चिन्हे आहेत. वायफळ खर्च करणे टाळावे. 

हे वाचलं का?
follow whatsapp