12 वर्षानंतर गुरू आणि शुक्र आले एकत्र 'या' राशीच्या लोकांची पाचही बोटं राहणार तुपात
मुंबई तक
14 Jun 2025 (अपडेटेड: 14 Jun 2025, 10:07 AM)
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, बारा वर्षांच्या अंतरानंतर गुरु आणि शुक्र यांनी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. याचा फायदा आता सर्व राशींना होत आहे. जुलै महिन्यात त्याचे काही परिणाम दिसून येत आहेत.
ADVERTISEMENT


1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू आणि शुक्र ग्रहांनी तब्बल बारा वर्षानंतर मिथून राशीत प्रवेश केला आहे. याचा फायदा आता सर्वच राशींना होतोय. याचे काही निकाल जुलै महिन्यात दिसून येत आहेत.


2/5
गुरू ग्रह हे समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतिक आहे. तर शुक्र ग्रह हा समृद्धी, संपत्ती आणि भौतिक सुख प्राप्तीचे प्रतीक आहे. हे दोन्ही ग्रह एकत्र आल्याने अपार संपत्ती, आदर मिळू शकतो. जाणून घेऊयात या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
ADVERTISEMENT


3/5
मिथून राशी
दोन्ही ग्रह एकत्र आल्याने मिथून राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. आपले व्यक्तिमत्व सुधारून वैवाहिक जीवनात आनंदी राहाल. कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होईल.


4/5
वृषभ राशी
जुलै महिन्यात वृषभ राशीच्या लोकांच्या वेतनात वाढ होईल. चांगली पदोन्नती होण्यास नशीब साथ देईल. खोळंबलेली कामं पूर्ण होतील. नवीन नोकरीसाठी किंवा व्यवसाय उभारण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे.
ADVERTISEMENT


5/5
मीन राशी
मीन राशीच्या लोकांचे नशीब जुलै महिन्यात चांगलं आहे. कारण या महिन्यात हे दोन्ही ग्रह एकत्र आलेत आणि याचा फायदा हा मीन राशीच्या लोकांवर होतोय. एखादं वाहन खरेदी करू शकता. मालमत्ता खरेदी करण्यास योग चांगला आहे.
ADVERTISEMENT
