Astrology : ऑगस्टच्या शेवटी ग्रहांची हालचाल, 'या' राशींचे नशीब फळफळणार
मुंबई तक
• 12:27 PM • 23 Aug 2026
Astrology : 24 ते 30 ऑगस्ट रोजी ग्रहांची स्थिती अनेक मोठे बदल दर्शवत आहे. या काळात सूर्य, बुध आणि केतू सिंह राशीत एकत्र असतील. या ग्रहस्थितीमुळे बुधादित्य योग तयार होताना दिसतो. ज्याचा काही राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होईल.
ADVERTISEMENT


1/6
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याच्या अंतिम टप्प्यात मोठी घडामोड होणार असल्याची शक्यता आहे. 24 ते 30 ऑगस्ट रोजी ग्रहांची स्थिती अनेक मोठे बदल दर्शवत आहे. या काळात सूर्य, बुध आणि केतू सिंह राशीत एकत्र असतील. या ग्रहस्थितीमुळे बुधादित्य योग तयार होताना दिसतो. ज्याचा काही राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होईल.


2/6
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी मानसिक दिलासा घेऊन येण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणात किंवा दिर्घकळ चाललेल्या वादात अडकले असाल, तर गोष्टी तुमच्या बाजूने वळण्याची अधिक शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची अधिक शक्यता आहे.
ADVERTISEMENT


3/6
वृश्चिक
या राशीतील व्यवसायिकांना आठवडा खूप फायदेशीर ठरण्याची अधिक शक्यता आहे. जुन्या ओळखींमुळे नवीन व्यवसायिक सौदे मिळण्यास मदत होईल. भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगला फायदा मिळण्याची अधिक अपेक्षा आहे. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत चांगली बातमी मिळू शकते.


4/6
मकर
मकर राशीच्या व्यक्तींना मालमत्ता किंवा स्थावर मालमत्तेवर पूर्वीच्या गुंतागुंतीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक योजनांना गती मिळेल आणि दीर्घकाळापासूनच्या आर्थिक अडचणी दूर होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल.
ADVERTISEMENT


5/6
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी रखडलेल्या प्रकल्पांना अचानक गती मिळेल. कामासंबंधित प्रवासातून भविष्यात फायदे मिळण्याची अधिक शक्यता आहे. व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील आणि नोकरी करणाऱ्यांना नवीन भूमिका दिल्या जातात.


6/6
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी उत्पन्नाचे स्त्रोत खुले होण्याची अधिक शक्यता आहे. नोकरीच्या बदलाची किंवा पदोन्नतीत वाट पाहत आहेत, त्यांना स्वत:ची योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT










