Astrology : शनी नक्षत्र बदलणार, दसऱ्यापूर्वी 'या' राशीचं भलं होणार
मुंबई तक
22 Aug 2026 (अपडेटेड: 22 Aug 2026, 01:17 PM)
Astrology : यंदाच्या विजयादशमी दसऱ्याच्या अगदी सुरुवातीला हे गोचर मुख्य प्रकारे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. तसेच आर्थिक परिस्थितीत फायदा होणार आहे, जाणून घ्या राशी.
ADVERTISEMENT


1/7
ज्योतिषशास्त्रात शनि देवाला कर्मफळ दाता आणि देवता मानले जाते. शनिदेवाची चाल ही अगदी मंद गतीने असते, मात्र याचा प्रभाव हा खोलवर आणि अधिक काळापर्यंत पोहोचतो. 20 ऑगस्ट 2026 रोजी रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश केल्यानंतर आता शनिदेव हा 49 दिवसानंतर 9 ऑक्टोबर 2026 रोजी पुन्हा आपले नक्षत्र बदलणार आहे. द्रिक पंचांगानुसार, 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शनि देव हा उत्तर भाद्रपद नक्षत्राच्या चतुर्थ पदात प्रवेश करणार आहे.


2/7
दरम्यान, यंदाच्या विजयादशमी दसऱ्याच्या अगदी सुरुवातीला हे गोचर मुख्य प्रकारे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. तसेच आर्थिक परिस्थितीत फायदा होणार आहे, जाणून घ्या राशी.
ADVERTISEMENT


3/7
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी या नक्षत्राचे परिवर्तन कार्यक्षेत्रात यश घेऊन येणारा आहे. व्यापारात नियोजनांचा चांगली गती मिळेल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकड़ून पाठिंबा मिळेल आणि नवीन जबाबदऱ्या किंवा पदोन्नतीची शक्यता अधिक असते. आपला आत्मविश्वास अधिक वाढेल.


4/7
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी 9 ऑक्टोबरनंतरचा काळ अनुकूल परिस्थिती घेऊन येणारा आहे. धडदडत असलेल्या कामात यश मिळण्याची अधिक शक्यता असते. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते आणि आर्थिक अडथळे दूर होऊ शकतात.
ADVERTISEMENT


5/7
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी या गोचरामुळे वैयक्तिक नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनात चांगली सुधारणा होईल. पती-पत्नी किंवा प्रिय व्यक्तींमधील कोणतेही जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे.


6/7
तूळ
तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या स्पर्धात्मक क्षमतेचा खूप फायदा होईल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर आणि शत्रूंवर वर्चस्व गाजवाल. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प आणि शिकण्याच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होईल.
ADVERTISEMENT


7/7
मकर
मकर राशीसाठी हा काळ आर्थिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही आघाड्यांवर मोठा दिलासा घेऊन येणारा आहे. दिर्घकाळापासून आर्थिक अडचणी किंवा कर्जांमध्ये सुधारणा होईल.
ADVERTISEMENT









