सूर्य आणि गुरु ग्रहांच्या युतीमुळे 'या' राशींचे लोक होणार मालामाल
मुंबई तक
29 May 2025 (अपडेटेड: 29 May 2025, 11:02 AM)
Astrology : सूर्य आणि गुरु ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या लोकांना चांगला अर्थिक लाभ मिळू शकतो. नेमकं ज्योतिषशास्त्र काय सांगत, हे जाणून घ्या
ADVERTISEMENT


1/6
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि गुरू हे दोन्ही राशी एकत्रित आल्याने संयोग निर्माण होईल. वैदिक ज्योतिषशास्त्र सांगतं की, काही राशींना सूर्यामुळे मान सन्मान, यश प्राप्त होणार आहे. गुरू या ग्रहामुळे ज्ञान, धनसंपत्ती आणि समृद्धी प्राप्त होणार आहे.


2/6
दरम्यान, गुरू आणि सूर्य या दोन्ही ग्रहांची युती होऊन मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्याचा परिणाम सर्वच राशींवर होणार आहे. पण हा काळ तीन राशींसाठी अधिक शुभ संकेत देणारा आहे. अशातच कोणत्या राशींना शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT


3/6
कन्या राशी : या राशींच्या लोकांचे भविष्यातील करिअर आणि प्रगती चांगली व्हावी. कन्या राशींच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरु या दोन्ही ग्रहांचं एकत्रित येणं शुभ असणार आहे. या योगामुळे तुमच्या कामजागातील जीवनात आपल्याला यश संपादन करता येणार आहे. नोकरदार वर्गाला पदोन्नती आणि करिअरसंबंधीत सकारात्मक वातावरण असणार आहे.


4/6
तूळ राशी : या दोन्ही ग्रहांच्या एकत्रित येण्याने तूळ राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार आहे. नोकरीत चांगला पद मिळून कामाचे कौतुक होणार आहे. व्यापारी वर्गाला नवीन करार मिळवण्याची आणि मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, तूळ राशींच्या लोकांना कोणत्याही शुभ कार्यामध्ये सहभागी होता येईल.
ADVERTISEMENT


5/6
मीन राशी : संपत्ती आणि सुखसोयीत वाढ होण्यासाठी हे संयोजन मीन राशीतील लोकांसाठी विशेषत: फायदेशीर आहे. नोकरीत पदोन्नती होईल. कामाचे कौतुक होणार असून व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर राहील.


6/6
दरम्यान, सूर्य आणि गुरू ग्रहांचे हे विशेष संयोजन काही राशींसाठी आनंददायी बातमी असणार आहे. दरम्यान, ग्रहांचे परिणाम हे व्यक्तींच्या कुंडलीवर अवलंबून असतात, म्हणून यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
