पंतप्रधानांच्या स्वाक्षरीपासून ते राज ठाकरेंची स्वाक्षरी काय सांगते? अंकशास्त्रज्ञांनी सांगितलं लॉजिक

मुंबई तक

• 08:00 AM • 21 Jul 2026

Navneet Mandhani : राजकीय नेत्यांच्या स्वाक्षरीवरून त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या गुणधर्माबाबतची माहिती नवनीत मानधनी यांनी दिली आहे. या राजकीय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचा अर्थ आणि नेत्यांचा स्वभाव गुण सांगितला आहे.

Navneet Mandhani

Navneet Mandhani

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नरेंद्र मोदींच्या स्वाक्षरीबाबत काय? 

point

देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीमागचं लॉजिक 

point

शरद पवार यांच्या स्वाक्षरीचा अर्थ 

point

राज ठाकरेंची स्वाक्षरी काय सांगते, अर्थशास्त्रांनी सांगितलं

Navneet Mandhani : अंकशास्त्र आणि स्वाक्षरी याचा काय संबंध? कारण स्वाक्षरीत तसा फार काही फरक पडत नाही. मात्र, असं असलं तरीही नवनीत मनधानी यांनी राजकीय नेत्यांच्या स्वाक्षरीवरून त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या गुणधर्माबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीबाबतची माहिती दिली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शिर्डी: महिलेवर 22 वर्षीय तरूणीकडून चाकूने 16 वेळा वार, पीडितेचा रूग्णालयात मृत्यू

नरेंद्र मोदींच्या स्वाक्षरीबाबत काय? 

अंकशास्त्रज्ञांनी अंकांप्रमाणे आता राजकीय नेत्यांच्या सह्यांवरून त्यांच्या गुणांबाबत किंवा त्यांच्या स्वभावाबाबत  शक्यता वर्तवली आहे. ज्या नेत्यांच्या सह्यांमध्ये गाठ असते, असे राजकीय नेते आतल्या गाठीचे असतात. ज्यात नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीत कुठेतरी गाठ दिसून येते. याचा अर्थ स्वाक्षरीत जे लोक सर्कर करतात त्यांचे कोणतेच प्लान हे कळत नाही, तेच नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीत दिसून येते. 

देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीमागचं लॉजिक 

दुसरी स्वाक्षरी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे. यांच्या स्वाक्षरीत सर्कल दिसून येत नाही, यांच्या स्वाक्षरीतील रेष ही काही प्रमाणात वर आणि अधिक प्रमाणात खाली आहे. शत्रूत्व दाखवलं जाणार नाही, पण काटा काढल्याशिवार राहणार देखील नाही,असा त्यांचा स्वभाव आहे. अशातच त्यांचा मूलांक हा 4 असल्याने ते अधिकच त्यांच्यासाठी सकारात्मक बाब आहे. 

शरद पवार यांच्या स्वाक्षरीचा अर्थ 

तिसरी स्वाक्षरी ही शरद पवार यांची आहे. तिसऱ्या स्वाक्षरीत नंबर पाच आणि दोन दिसत आहे. नंबर दोन हा भावनिकपणे लोकांशी जोडली जाणारी एक ओळख आहे. तर नंबर पाचचा असा अर्थ असतो, की जो कोणी त्यांना भेटतो त्या व्यक्तीच्या सदैव स्मरनात राहतो. तसेच शरद पवार यांच्या स्वाक्षरीवर रेष नसल्यास तो व्यक्ती महत्त्वाकांक्षी असतो. 

हे ही वाचा : CJP आंदोलकांवर निर्घृणपणे लाठीचार्ज, जंतर-मंतरवर नेमका राडा झाला तरी कसा? पाहा VIDEO

राज ठाकरेंची स्वाक्षरी काय सांगते, अर्थशास्त्रांनी सांगितलं

 

राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचा देखील अर्थ अंकशास्त्रांनी समजून सांगितला. ते म्हणाले की, त्यांच्या स्वाक्षरीतील पहिल र हा खूपच खाली गेलेला आहे. त्यांच्या पक्षाप्रमाणे त्यांच्या र ची अस्थिरता दिसून येते. भावनिकदृष्ट्या ते लोकांच्या जवळ जातात, मात्र निवडणुकीत त्यांच्या बाजूने निकाल लागत नाहीत, असं नवनीत मनधानी यांनी माहिती दिली.