नरेंद्र मोदी की राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान कोण? अंकशास्त्रज्ञाच्या अंदाजानं उडाली खळबळ

मुंबई तक

• 08:00 AM • 20 Jul 2026

Who Next PM Of India 2029 : मुंबई तक बैठकच्या कार्यक्रमात अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी यांनी मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांनी अनेक बाबींवर भाष्य केलं होतं. मात्र या मुलाखतीत बोलताना 2029 मध्ये मोदी की गांधी नेमकं पंतप्रधान होतील? असा प्रश्न केला असता, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

Who Next PM Of India 2029

Who Next PM Of India 2029

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नरेंद्र मोदी की राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान कोण?

point

अंकशास्त्रज्ञाच्या अंदाजानं उडाली खळबळ

Who Next PM Of India 2029 : अंकशास्त्राकडे अनेकांचा कल पाहायला मिळतो, अंकशास्त्राच्या माध्यमातून काही अंदाज वर्तवलेले असतात, अनेकदा ते अंदाज खरे देखील होतात. अशातच नुकत्याच झालेल्या मुंबई तक बैठकच्या कार्यक्रमात अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी यांनी मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांनी अनेक बाबींवर भाष्य केलं होतं. मात्र या मुलाखतीत बोलताना 2029 मध्ये मोदी की गांधी नेमकं पंतप्रधान होतील? असा प्रश्न केला असता, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सुप्रिया सुळे यांनी राजनाथ सिंह यांचा घेतला आशीर्वाद, व्हिडिओ व्हायरल

नेमकं काय म्हणाले नवनीत मानधानी? 

मी फार नाही, पण काही प्रमाणात राजकीय घडामोडी पाहत असतो. यात उत्तर प्रदेशातील निवडणुकीची फार महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अशा स्थितीत योगी आदित्यनाथ यांचा अवघड काळ असण्याची शक्यता आहे. जर उत्तर प्रदेशात जर काही झालं, तर काही तरी चित्र पालटण्याची शक्यता आहे. माझा आणखी एक अंदाज आहे की, 2029 मध्ये काँग्रेसच्या सीट्स वाढण्याची शक्यता आहे, मात्र पंतप्रधान राहुल गांधी होणार नाहीत. तर नरेंद्र मोदी देखील पंतप्रधान होणार नाहीत, असं ते म्हणाले. 

'नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत'

मात्र, असं जरी असलं तरीही 2029 मध्ये भाजपच्याच अधिक जागा येण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता अधिक कमी असेल असं माझं शास्त्र सांगतं, असं नवनीत मानधानी म्हणाले. 

हे ही वाचा : वडील फुटपाथवर बॅग विकतात, मुलाचं NEET परीक्षेत यश; ओमची ह्रदयस्पर्शी कहाणी

त्यानंतर 2029 मध्ये राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता आहे.