आदित्य ठाकरे, रोहित पवार की श्रीकांत शिंदे राज्याचा तरुण मुख्यमंत्री कोण होईल? अंकशास्त्रज्ञांनी दिलं उत्तर

मुंबई तक

• 07:00 AM • 17 Jul 2026

Who Is Next Cm Of Maharashtra : मुंबई तक बैठक या कार्यक्रमात प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी आले होते. त्यांनी राजकीय नेत्यांच्या मूलांकावरून त्यांच्या गुणांबाबत माहिती देखील दिली होती. एवढंच नसून त्यांनी याआधारे आगामी राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

Who Is Next Cm Of Maharashtra

Who Is Next Cm Of Maharashtra

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? 

point

संदर्भसहित नवनीत मानधानी यांचं उत्तर 

Who Is Next Cm Of Maharashtra : देशासह जगभरातील अनेकांना अंकशास्त्रांबाबत कुतूहल असतं, तर काहींना त्याबाबत जाणून देखील घ्यायचं असतं. मुंबई तक बैठक या कार्यक्रमात प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी आले होते. त्यांनी राजकीय नेत्यांच्या मूलांकावरून त्यांच्या गुणांबाबत माहिती देखील दिली होती. एवढंच नसून त्यांनी याआधारे आगामी राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुणाने महिला कॉन्स्टेबलला गुप्तांग दाखवलं, डिलिव्हरी बॉयला दाखवला इंगा

भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? 

आताच्या घडीला तुमच्या अंकशास्त्रानुसार जे तरुण आताचे नेते आहेत, त्यापैकी कोणी भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील? असा अंकशास्त्रज्ञाना प्रश्न केला होता. त्यावर नवनीत मानधानी यांनी मूलांक 1 आणि भाग्यांक 4 असलेले मुख्यमंत्री होऊ शकतात असे त्यांनी सांगितलं. 

संदर्भसहित नवनीत मानधानी यांचं उत्तर 

त्यांनी पुढे उत्तर देताना काही उदाहरणं देखील दिली होती. ते म्हणाले की, "महाराष्ट्र दिन 1 मे रोजी साजरा केला जातो, त्याचा मूलांक 1 आणि भाग्यांक 4 आहे. याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांचा मुलांक 1 आणि भाग्यांक 4 राहिलेला आहे. ज्यात देवेंद्र फडणवीस आणि सुशीलकुमार शिंदे हे मूलांक 4 आणि भाग्यांक 1 आहे."

"महाराष्ट्राचा आगामी तरुण मुख्यमंत्री श्रीकांत शिंदे"

"नारायण राणे मूलांक 1 आणि भाग्यांक 4, एकनाथ शिंदे मूलांक 9 आणि भाग्यांक 4 असा आहे. याचा संदर्भ का देतोय, कारण या पुढील यंग ब्रिगेड आदित्य ठाकरे, श्रीकांत शिंदे आणि रोहित पवार असणार आहे. मी या मंचावरून तुम्हाला सांगतो की, पुढील आश्वासक तरुण मुख्यमंत्री श्रीकांत शिंदे असणार आहे. हे शक्य होण्याची चिन्हे असू शकतात", असं ते म्हणाले.  

हे ही वाचा : पुणे: शिक्षकाकडून नववीतील मुलीचा छळ, नको तिथेच स्पर्श केल्याचा पीडितेचा आरोप

"जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार आले तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी माहिती दिली होती आणि तेव्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले. तसेच मी एकदा सांगितलं होतं की, ठाकरेंच्या कुटुंबातील मुख्यमंत्री होईल असं सांगितलं होतं, तेव्हा आदित्य ठाकरे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते", असा संदर्भ देत त्यांनी अंदाज वर्तवला आहे.