Palghar News : बोईसर-नवापूर मार्गावरील पाम टेंभी गावाच्या हद्दीत बाईक आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत बाईकवरून प्रवास करणाऱ्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहित शर्मा, रवी गुप्ता आणि नयन महातो अशी या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नागपूर: 19 वर्षीय BDS विद्यार्थ्यावर रॅगिंग, अश्लील कृत्य केल्याचा आरोप
दुचाकीची समोरील ट्रकला मागून जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तिन्ही विद्यार्थी बोईसरमधील गणेश नगर परिसरातील रहिवासी होते. संध्याकाळच्या सुमारास हे तिघेजण एकाच दुचाकीवरून नांदगाव-आलेवाडी बीचवर फिरण्यासाठी जात होते. बोईसर-नवापूर रोडवरील पाम टेंभी गावाजवळ आले असता, भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची समोरील ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
दुर्घचनेत तिन्ही विद्यार्थी रस्त्यावर फेकले
ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तिन्ही विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने मोहित, रवी आणि नयन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : पुणे : 'तो' संशय व्यक्त केल्यानं कोमलची हत्या, सॉफ्टवेअर इंजिनिअरने क्रूरतेचा कळस गाठला
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत. एकाच परिसरातील तीन तरुण विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण बोईसर आणि गणेश नगर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












