Navneet Mandhani : देशच नाही, तर जगभरातील लोकांना मूलांकाकडे अधिक ओढ आहे. मुंबई तक बैठकवर अंकशास्त्रज्ञ नवनीत मनधानी यांनी मूलांकाबाबत माहिती दिली. मुलाखतीदरम्यान त्यांनी देशाचे पंतप्रधान यांच्या मूलांकाबाबत माहिती देत त्यांच्या गुणांबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा 17 सप्टेंबर असून त्यांचा मूलांक 8 आहे, याबाबतची माहिती त्यांनी दिली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Devendra Fadanvis : '48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ', मुख्यमंत्र्यांची घोषणा
मूलांक 8 मध्ये 17,26 आणि 8 या दिवशी जन्मलेल्या लोकांचा समावेश असतो. 17 सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्मदिवस आहे. यांचा मूलांक 8 असून या मूलांकाचे लोक अठरा अठरा तास काम करत असतात. ते सगळ्यात प्रामाणिक असतात. यांचा भाग्योदय हा चाळीशीनंतर होतो.
नरेंद्र मोदींचा मूलांक किती?
नरेंद्र मोदींच्या मूलांकानुसार, त्यांना खरं बोलणारी मुलं आवडतात. जेव्हा मूलांक नंबर 8 चे लोक प्रामाणिक न राहिल्यास ते लवकर रोडवर येतील, अशी नवनीत मनधानी यांनी महिती दिली होती. नंतर त्यांनी मूलांक 9 ची माहिती दिली होती.
मूलांक 9 चे कसे असतात?
मूलांक 9 चे लोक हे मनाने खूप चांगली असतात. करणासारखं त्यांचं हृदय असतं. या मूलांकाच्या व्यक्तींचे मूलांक 4 असलेले लोकांशी फार जमत नाही. या मूलांकाचे 1 नंबरचा मूलांक असलेल्या व्यक्तींशी चांगले जमते, अशी माहिती नवनीत मनधानी यांनी दिली होती.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट: सरकारची कारवाई, शाळांबाहेर कॅफीनयुक्त ड्रिंक्सची विक्री सुरूच
राहुल गांधींचा मूलांक
ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 आहे, अशा लोकांचा मूलांक हा एक आहे त्यांच्यात काही चांगले गुण असतात. मूलांक एक असलेली राजकीय व्यक्ती राहुल गांधी आहेत. ते चांगले अॅक्टिव्ह असतात, त्यांच्यात लीडरशीप गुण असतो, हे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात. ज्यांची जन्म तारीख 1 आहे, त्यांचा कधीही अहंकार दुखवू नये. एकदा का जर अहंकार दुखावला तर त्यांच्याऐवढं वाईट कोणीच नसतं, असं अंकशास्त्रज्ञ मनधानी यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT












