Vaidhriti Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या चालीत झालेल्या बदलामुळे अनेक महत्त्वाचे योग निर्माण होतात. द्रिक पंचांगानुसार 4 जून रोजी सायंकाळी6 वाजून 09 मिनिटांनी असाच एक विशेष 'वैधृती योग' सुरू होत आहे. सूर्य आणि चंद्राच्या युतीमुळे निर्माण होणारा हा योग सर्व बारा राशींवर प्रभाव पाडेल, परंतु काही विशिष्ट राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानला जात आहे.
ADVERTISEMENT
'या' राशींच्या नशीबात आहे खास योग
मेष : या राशीच्या लोकांसाठी धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल, वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील आणि बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
सिंह : या राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. त्यांना समाज आणि कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी किंवा पद मिळू शकते, तसेच व्यवसायात नवीन फायदेशीर करार होऊ शकतात.
हे ही वाचा : बीड : सिनेमाला लाजवेल असा कट! मर्डर मिस्ट्रीचा पोलिसांकडून उलगडा
तूळ : या राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल.
धनु : या राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्यवृद्धी करणारा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये यशाचे संकेत असून, धार्मिक कार्यात रस वाढेल आणि वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather Update : मान्सूनचा वेग वाढला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत धडकणार?
'या' गोष्टी करणे शुभ
या विशेष योगाच्या काळात सूर्यदेवाला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी तांब्याच्या पात्रात पाणी, लाल चंदन आणि फुले टाकून सूर्याला अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. यासोबतच ‘ओम सूर्याय नमः’ आणि ‘ओम चंद्राय नमः’ या मंत्रांचा जप करणे फलदायी ठरते. तसेच, या काळात गरजू लोकांना धान्य, वस्त्र किंवा तांब्याच्या वस्तूंचे दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी आणि सकारात्मक फळ प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
ADVERTISEMENT











