बीड : 20 वर्षीय पूजाने आयुष्याचा दोर कापला, असं घडलं तरी काय?

beed crime news : बीडच्या गेवराईमध्ये 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, माहेरच्यांच्या तक्रारीवरून पतीसह सहा जणांविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

beed crime news

beed crime news

मुंबई तक

04 Jun 2026 (अपडेटेड: 04 Jun 2026, 11:32 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड : 20 वर्षीय पूजाने आयुष्याचा दोर कापला

point

असं घडलं तरी काय?

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूजा प्रमोद सुरवसे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणाने सासरच्या मंडळींच्या क्रूरतेची सर्वांसमोर उघड झालीये. मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'त्याने कारमध्येच माझ्यावर...' डेप्युटी कलेक्टरचे कृत्य; 32 वर्षीय महिलेनं काय सांगितलं?

पूजाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पूजाचे तिच्या माहेरच्यांशी बोलणे झाले होते, मात्र त्यानंतर काही तासांतच तिला मृत अवस्थेत पाहण्याचे दुर्दैव तिच्या कुटुंबीयांवर ओढवले. वडिलांना फोनवरून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली, जिथे त्यांना मुलीचा मृतदेह पाहून धक्का बसला. पूजाचा मृतदेह गेवराई येथील शासकीय रुग्णालयात आढळून आला. या घटनेने पूजाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा : Pune Metro : हिंजवडीतील IT कंपनीने रातोरात गाशा गुंडाळला, अन् 700 तरुण रस्त्यावर

सासरच्या छळाला वैतागून पूजाने उचलले टोकाचे पाऊल 

मृत विवाहितेच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर पूजाचा पती प्रमोद साईनाथ सुरवसे, सासरे साईनाथ बापुराव सुरवसे, सासू उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे, दीर गणेश साईनाथ सुरवसे, जाऊ आरती गणेश सुरवसे आणि नणंद अर्चना तुळसे यांनी तिला सतत त्रास दिला. लग्नानंतर हे सर्वजण पूजाकडे व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होते. या मागणीसाठी तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत होते. या जाचाला कंटाळून आणि सासरच्या छळाला वैतागून पूजाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस यंत्रणेकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. तक्रारीतील सर्व मुद्द्यांची पडताळणी केली जात असून, पोलिसांकडून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विवाहितेच्या आत्महत्येमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, हुंडाबळीच्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा विवाहित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.