Pune Metro : हिंजवडीतील IT कंपनीने रातोरात गाशा गुंडाळला, अन् 700 तरुण रस्त्यावर
Pune Metro : हिंजवडीतील कथित आयटी भरतीतील फसवणुकीमुळे शेकडो तरुणांचे करिअर अडचणीत आले आहे. नोकरी, इंटर्नशिप आणि मोठ्या पॅकेजच्या आश्वासनांनंतर अनेक विद्यार्थ्यांनी फसवणुकीची तक्रार केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Pune Metro : हिंजवडीतील IT कंपनीने रातोरात गाशा गुंडाळला
, अन् 700 तरुण रस्त्यावर
Pune Metro : पुण्यातील हिंजवडी परिसरात उघडकीस आलेल्या कथित आयटी भरतीतील फसवणुकीच्या प्रकारामुळे 500 ते 700 तरुणांचे करिअर धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून आलेल्या फ्रेशर विद्यार्थ्यांनी या प्रकरणात तक्रारी दाखल केल्या आहेत. नोकरी, इंटर्नशिप आणि आकर्षक वार्षिक पॅकेजचे आश्वासन देत विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये सामील करून घेण्यात आलं. त्यानंतर प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले. काही विद्यार्थ्यांना अधिकृत ऑफर लेटरही देण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरची मोठी स्वप्ने दाखवण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नाशिकमध्ये महायुतीत फुट? बंडखोरी केल्याने चर्चेला उधाण
वार्षिक साडेपाच लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजची हमी देऊन फसवणूक
तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये विविध महाविद्यालयांमध्ये कॅम्पस रिक्रुटमेंटच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरुवातीला दोन महिन्यांचे प्रशिक्षण, त्यानंतर इंटर्नशिप आणि पुढे कामगिरीच्या आधारे कायम नोकरी देण्याचे सांगण्यात आले. याचबरोबर वार्षिक साडेपाच लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजची हमीही देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप, राऊटर आणि इतर सुविधा देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 15 हजार रुपये डिपॉझिट म्हणून घेण्यात आल्याचा आरोप आहे. ही रक्कम कंपनीच्या खात्यात न जाता वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी काम सुरू केले, मात्र त्यांना अपेक्षित वेतन मिळाले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नाशिकमध्ये महायुतीत फुट? बंडखोरी केल्याने चर्चेला उधाण









