पैसा-पाणी : AI मुळे तुमची नोकरी जाणार? काय सांगतेय जगभरातली परिस्थिती?

मुंबई तक

22 Jun 2025 (अपडेटेड: 22 Jun 2025, 12:42 PM)

Generative AI पाहू शकतो, ऐकू शकतो, लिहू शकतो, बोलू शकतो. यामुळे आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला शक्य असलेली सर्व कामं तोही करू शकतो.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

ChatGPT ला लॉन्च होऊन अजून 1000 दिवस...

point

जगभरात कसा होतोय AI चा परिणाम?

point

AI म्हणजे काय? नोकरीवर कसा होईल परिणाम?

ChatGPT ला लॉन्च होऊन अजून 1000 दिवस (खरं तर 904 दिवस) देखील झाले नाहीत, तरीही एवढ्या कमी वेळातही नोकऱ्यांवर परिणाम दिसायला लागले आहेत. Amazon चे सीईओ अँडी जेसी यांनी सांगितलं की, येत्या काही वर्षांत कंपनी नोकऱ्या कमी करेल. ChatGPT सारखीच Generative Artificial Intelligence (AI) असलेली अॅप म्हणजे Claude. त्या कंपनीचे सीईओ डॅरियो अमोडेई यांनी सांगितलं की, व्हाईट कॉलर नोकऱ्यांवर संकट येईल. आज आपण तेच समजून घेऊ की, एआयचा नोकऱ्यांवर काय परिणाम होईल?

हे वाचलं का?

एआय म्हणजे काय ते समजून घ्या...

हे ही वाचा >> Personal Finance: Mutul Fund खरंच सहीए... त्यावर Loan पण मिळतं बरं!

एआय म्हणजे एक कॉम्प्युटर प्रोग्राम आहे, जो आपल्या सारखं काम करू शकतो. सध्या तो फक्त तेवढंच काम करू शकतो जेवढं त्याला शिकवलं गेलंय. एआयच्या भाषेत याला मॉडेलची ट्रेनिंग म्हणतात. यात क्रांती झाली ती 2022 मध्ये ChatGPT लॉन्च झाल्यावर. हे एक चॅटबॉट आहे जो तुमच्या जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. जगभरातील उपलब्ध माहिती त्याला शिकवली गेली आहे. त्याच्या आधारावर तो आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो.

नोकऱ्यांवर परिणाम कसा? 

Generative AI पाहू शकतो, ऐकू शकतो, लिहू शकतो, बोलू शकतो. यामुळे आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला शक्य असलेली सर्व कामं तोही करू शकतो. विशेषतः ज्या कामात काही पॅटर्न आहे, जे रोजचं रोज होतं, जसं की ब्लड टेस्टची रिपोर्ट किंवा X-Ray रिपोर्ट वाचणं, समजून घेणं, कस्टमर केअरवर ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं देणं, कोणत्याही प्रकारची रिपोर्ट तयार करणं इत्यादी कामं. उदाहरणार्थ, JP Morgan ने सांगितलं की, IPO साठी लागणारा रिपोर्ट तयार करण्यासाठी अनेक दिवस लागायचे, ते काम आता AI काही मिनिटांत करतो. भाषांतर असो वा कॉपी एडिटिंग, हे काम AI उत्तम करतोय. सॉफ्टवेअर इंजिनीअरप्रमाणे तो कोड देखील लिहू शकतो.

नोकऱ्यांमध्ये कपात होणार? 

Goldman Sachs ने सांगितलं की जगभरात 30 कोटी नोकऱ्यांवर AI परिणाम करू शकतो. ब्रिटिश टेलिकॉम कंपनी BT ने सांगितलं की ते 10,000 नोकऱ्या कमी करतील. Amazon बद्दलही अशीच माहिती समोर आली आहे. Anthropic च्या सीईओने सांगितलं की, AI बाबत सर्वजण गोड गोड बोलतायत, ना सरकार खरं सांगत आहे ना कंपन्या. त्यांचं म्हणणं आहे की निम्म्या नोकऱ्या AI मुळे जातील.

हे ही वाचा >> Personal Finance: PF मधून मिळणाऱ्या Free विम्यासाठी समोर आली सगळ्यात मोठी अपडेट

एआयचं दुसरी बाजू आशादायी

वीज आल्यानं नोकऱ्या गेल्या नाहीत, मोटार वाहनं आल्याने नोकऱ्या गेल्या नाहीत, कॉम्प्युटर किंवा इंटरनेटमुळे नोकऱ्या गेल्या नाहीत. बँकेत पैसे हाताळण्याच्या जागी ATM मशीन आली, तरीही दुसऱ्या प्रकारच्या नोकऱ्या निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे AI मुळे काही नोकऱ्या जातील, तर काही नव्या नोकऱ्या निर्माण होतील. AI साठी चिप बनवून श्रीमंत झालेल्या Nvidia चे सीईओ जेन्सन हुआंग म्हणतात, “AI तुमची नोकरी घेणार नाही, तुमची नोकरी ती व्यक्ती घेईल जी AI चा वापर करायला शिकली आहे.” शेवटी माझा सल्ला हाच आहे की AI शिका. नोकरीचं काय होईल माहीत नाही, पण AI शिवाय भविष्यात नोकरी मिळणार नाही हे नक्की!