पहिली बातमी, Artificial intelligence (AI)चिप बनवणारी कंपनी Nvidia या कंपनीचे बाजार भांडवल (market cap) भारतीय बाजारात लिस्ट असलेल्या सर्व कंपन्यांच्या बाजार भांडवलापेक्षा जास्त झाले आहे. एक अमेरिकन कंपनीने आपल्या पाच हजार कंपन्यांवर भारी पडली आहे.
ADVERTISEMENT
दुसरी बातमी, परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत भारतीय बाजारात जवळपास 2 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. हे मागील संपूर्ण वर्षापेक्षा जास्त आहे.
या दोन्ही बातम्यांची उत्तरं मिळाली ती प्रसिद्ध लेखक रुचिर शर्मा यांच्या मुलाखतीमधून. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, परदेशी गुंतवणूकदारांना असं वाटतं की, भारत एआय (AI) मध्ये मागे पडला आहे. गुंतवणूकदार सध्या एआय (AI) मध्ये गुंतवणूक करू पाहत आहेत, जिथे त्यांना भविष्यात नफा दिसतोय. भारतात गुंतवणूक करण्यासाठी एआय (AI) कंपन्याच नाहीत. हेच एक प्रमुख कारण आहे की, भारतीय शेअर बाजार दोन वर्षांपासून स्थिर आहे, तर याच काळात Nvidia कंपनीच्या शेअरची किंमत 5-6 पटीने वाढली आहे.
रुचिर शर्मा यांच्या आधी, ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनने (Bernstein) देखील AI मध्ये भारत मागे पडण्याबद्दल भाष्य केले होते. त्यांच्या मते, भारत हा केवळ AI चा यूजर बनून राहील असा धोका आहे. अमेरिकेसारखे देश AI मॉडेल्स विकसित करत आहेत. जर आपण त्यांचा फक्त वापर करत राहिलो, तर अमेरिकन कंपन्या पैसे कमावतील.
AI च्या बाबतीत आपण कुठे आहोत? हे समजून घेण्यासाठी, AI चे पाच स्तर आहेत हे समजून घ्या.
पहिला टप्पा म्हणजे वीज. AI ला खूप विजेची गरज असते. भारतात वीज आहे, पण ती महाग आहे आणि तिचा पुरवठा विश्वासार्ह नाही.
दुसरा टप्पा म्हणजे Compute, म्हणजेच हार्डवेअर. GPU, म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. याला सेमीकंडक्टर किंवा चिप असेही म्हणतात. NVidia सारख्या कंपन्या या बाबतीत खूप पुढे आहेत. GPU हा AI चा मेंदू आहे. जेव्हा तुम्ही AI ला काही विचारता, तेव्हा त्याचे उत्तर येथेच तयार होते.
तिसरा टप्पा म्हणजे डेटा. हे AI चे इंधन आहे. भारताकडे त्याच्या लोकसंख्येमुळे मुबलक डेटा आहे. हा आपला फायदा आहे, पण हा डेटा अमेरिकन कंपन्यांकडे जात आहे कारण आपण अमेरिकन मॉडेल्स वापरत आहोत.
चौथा टप्पा म्हणजे AI मॉडेल्स आहे.. जसं की, ChatGPT, Gemini आणि Claude सारखे . भारत या क्षेत्रात नुकताच प्रवेश करत आहे.
पाचवा आणि अंतिम टप्पा म्हणजे Use cases, म्हणजेच तुम्ही AI मॉडेल्सचा वापर विविध उद्देशांसाठी करू शकता.
Infosys चे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी भारताने वापराच्या विविध पद्धतींवर (use cases) लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन केले आहे. हे काम आधीच सुरू झाले आहे. येथे डेटा सेंटर्स उभारण्याचे काम सुरू आहे, जिथे डेटावर प्रक्रिया केली जाईल. AI च्या वापरामुळे AI ची मागणी वाढेल. सरकारने डेटा सेंटर्स उभारण्यासाठी कर सवलतही दिली आहे. हा आपला फायदा ठरू शकतो. तथापि, आपण जीपीयू (GPUs) आणि AI मॉडेल्सच्या बाबतीत अमेरिकेवर अवलंबून आहोत.
माहिती तंत्रज्ञानाच्या (Information Technology) सुरुवातीच्या टप्प्यात भारताला एक आघाडी मिळाली होती. AI मुळे ती आघाडीही धोक्यात आली आहे. परदेशी कंपन्यांना स्वस्त सेवा पुरवून आपण ही आघाडी मिळवली होती. आपण गूगल किंवा ॲमेझॉनसारखी कोणतीही मोठी उत्पादने तयार केलेली नाहीत. आता, जर आपण AI मध्ये मागे पडलो, तर आपली अवस्था केवळ ग्राहकांपुरती मर्यादित राहील, जसे इंटरनेटच्या जगात आपण केवळ भाडेकरू आहोत आणि अमेरिकन मालक आहेत.
ADVERTISEMENT











