Railway budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप घेणारी घोषणा केली आहे. देशभरात 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर उभारण्यात येणार असून, यामुळे मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, वाराणसी आणि सिलीगुडीसारखी प्रमुख शहरे वेगवान रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत. या निर्णयामुळे देशातील दळणवळण अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे.
ADVERTISEMENT
अर्थमंत्री सीतारामन यांनी हे हायस्पीड रेल्वे मार्गांना ‘ग्रोथ कनेक्टर्स’ असल्याचे सांगितले आहे. हे मार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणारे नसून, आर्थिक विकासाला चालना देणारे ठरणार आहेत. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणारे हे रेल्वे कॉरिडोर कमी कार्बन उत्सर्जनासह दीर्घ पल्ल्याचा प्रवास अधिक सोयीस्कर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : अल्पवयीन तरुणांचा 6 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार... आरोपीच्या आईने स्वतःच्या मुलासोबत पाहा केलं तरी काय
हे आहेत प्रस्तावित 7 हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर
1. मुंबई–पुणे : महाराष्ट्रातील दोन प्रमुख आर्थिक आणि औद्योगिक शहरांमधील प्रवास जलद गतीने होणार आहे.
2. पुणे–हैदराबाद : महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे.
3. हैदराबाद–चेन्नई : दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमधील संपर्क अधिक मजबूत करेल.
4. हैदराबाद–बेंगलोर : आयटी क्षेत्रातील दोन मोठ्या केंद्रांमधील प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
5. चेन्नई–बेंगलोर : तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील हायस्पीड रेल्वे संपर्क वाढवणारा मार्ग.
6. दिल्ली–वाराणसी : राजधानी दिल्लीला उत्तर प्रदेशातील धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या वाराणसीशी जोडणारा हा कॉरीडॉर पर्यटन आणि व्यापाराला चालना देईल.
7. वाराणसी–सिलीगुडी : पूर्व भारतासाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग पश्चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांशी संपर्क अधिक मजबूत करणार आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले की, ही घोषणा अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा विकासावर दिलेल्या विशेष भराचा एक भाग आहे. देशात वेगवान रेल्वे नेटवर्क विस्तारून नागरिकांचा प्रवास सुलभ करणे, व्यापार गतीमान करणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
सध्या मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पावर काम सुरू असून, या अनुभवाच्या आधारे आता आणखी 7 नवीन हायस्पीड रेल कॉरीडॉर उभारण्यात येणार आहेत. यामुळे भारताचे रेल्वे जाळे अधिक आधुनिक, सक्षम आणि जागतिक दर्जाचे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रकल्पांमुळे शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावेल. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बीड : मोबाईल अन् दारुसाठी पैशांचा वाद, नातवाने आजोबाला संपवलं; अन् नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला
ADVERTISEMENT











