अमरावती : AIMIM चा नगरसेवक अपात्र, 28 दिवसात आयुक्तांचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

Amravati Politics : कंत्राटदारीचा मुद्दा उपस्थित करत अमरावती महापालिका आयुक्तांनी एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक मुनज्जर अली यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली आहे. महापालिका प्रशासनाच्या रेकॉर्डनुसार अली हे कंत्राटदार असल्याचे सिद्ध झाल्याने, आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 16 मार्च रोजी ही अधिकृत घोषणा केली.

Amravati Politics

Amravati Politics

मुंबई तक

18 Mar 2026 (अपडेटेड: 18 Mar 2026, 09:25 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती : AIMIM चा नगरसेवक अपात्र

point

28 दिवसात आयुक्तांचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

Amravati Politics : अमरावती महापालिकेतील एमआयएमचे नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक मुनज्जर अली यांना कंत्राटदारीच्या मुद्यावरून अखेर अपात्र ठरविण्यात आले आहे. महापालिका रेकॉर्डवर ते कंत्राटदार असल्याचा ठपका ठेवत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 16 मार्च रोजी याबाबतचे आदेश जारी केले. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 10 (फ) व 10 (ग) अन्वये, महापालिकेचे कंत्राटदार असलेली व्यक्ती नगरसेवक म्हणून पात्र राहत नाही. मुनज्जर अली यांच्या नियुक्तीवेळी ते महापालिकेच्या कंत्राटाशी संबंधित असल्याचे नोंदीत नमूद असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले.

हे वाचलं का?

मुनज्जर अली यांची 20 फेब्रुवारी 2026 रोजी स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती झाली होती. मात्र, केवळ काही दिवसांतच 27 फेब्रुवारी रोजी त्यांना अपात्रतेसंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत राजकीय भूकंप! ठाकरे गटाच्या नगरसेवकाचा शिंदेसेनेत प्रवेश; पोटनिवडणूक होण्याची शक्यता

ईटकॉन कंपनीशी संबंध ठरला निर्णायक

महापालिकेच्या तपासणीत ईटकॉन ई-सोल्यूशन प्रा. लि. (नोएडा) व ईटकॉन प्रा. लि. गो सोल्यूशन (अमरावती) यांच्या निविदा प्रक्रियेत सहभाग आढळून आला. मनुष्यबळ पुरवठ्यासाठी 8 एप्रिल 2022 रोजी करण्यात आलेल्या करारनाम्यावर मुनज्जर अली यांची स्वाक्षरी असल्याचे समोर आले. हा करार 7 एप्रिल 2025 रोजी संपुष्टात आला असला तरी, संबंधित नोंदीमुळे त्यांची पात्रता प्रश्नात आली.

नगरसेवकाची हायकोर्टात धाव

9 मार्च 2026 रोजी सादर झालेल्या समिती अहवालानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. विधी अधिकारी श्रीकांतसिंह चव्हाण यांनी कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयाविरोधात मुनज्जर अली यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता न्यायालयीन वळण मिळाले असून पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सातारा : कराडमध्ये भीषण अपघात; शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले… कंटेनरच्या भरधाव वेगानं होत्याचं नव्हतं झालं

    follow whatsapp