राष्ट्रवादीचे खासदार फुटणार? शरद पवारांनी एकाच वाक्यात सांगितलं, काय म्हणाले?

मुंबई तक

• 11:37 AM • 25 Jun 2026

ठाकरे गटाचे खासदार फुटल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार देखील फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

Sharad Pawar On Split Among MPs

Sharad Pawar On Split Among MPs

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रवादीचे खासदार फुटणार?

point

शरद पवारांनी एकाच वाक्यात सांगितलं

point

काय म्हणाले?

Sharad Pawar On Split Among MPs, वसंत मोरे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिवसेना शिंदे गटात सामील झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार देखील फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, आगामी काळात आणखी मोठे फेरबदल पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार फुटणार?

या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार देखील फुटू शकतात आणि राज्यात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळतील, असे संकेत काही राजकीय विश्लेषक आणि नेत्यांकडून दिले जात होते. या अफवांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काय चालले आहे, याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना या सर्व चर्चांवर अत्यंत स्पष्ट शब्दांत भाष्य केले. खासदार फुटीच्या सुरू असलेल्या या चर्चांना कोणताही आधार नसल्याचं सांगत पवारांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

हे ही वाचा : सिया वारंवार मागे वळून पाहायची, पोलिसांना तिथेच संशय आला, CCTV मध्ये काय दिसलं?

शरद पवार काय म्हणाले?

खासदार फुटण्याच्या चर्चेवर बोलताना पवार म्हणाले की, 'या चर्चेला काही अर्थ नाही. आमचा एकसुद्धा जाणार नाही.'  पवारांच्या या थेट विधानामुळे खासदार फुटीच्या सुरू असलेल्या सर्व चर्चांवर अखेर पडदा पडला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पूर्णपणे एकसंध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

हे ही वाचा : चेतनच्या वडिलांचा सियाविषयी धक्कादायक दावा, काय म्हणाले?

बारामतीच्या दौऱ्यावर

शरद पवारांनी या वादावर पडदा टाकला असला तरी राजकीय समीकरणे पुढे कोणतं वळण घेतात, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. दरम्यान, शरद पवार आज (25 जून) बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.