'2047 पर्यंत भारत बनणार ग्लोबल लीडर...' निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे

Union Budget 2026 : निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठी अपडेट दिली. सीतारामन म्हणाल्या की, 'आपण लवकरच सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत.' यासोबतच त्यांनी सांगितले की, 'आमच्या सरकारच्या काळात भारतातील 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. 2047 पर्यंत आपण 'ग्लोबल लीडर' बनू असंही त्या म्हणाल्या.'

Union Budget 2026

Union Budget 2026

मुंबई तक

01 Feb 2026 (अपडेटेड: 01 Feb 2026, 12:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

2047 पर्यंत भारत बनणार ग्लोबल लीडर

point

निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Union Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी 3.0 या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा नववा अर्थसंकल्प आहे. त्यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठी अपडेट दिली. सीतारामन म्हणाल्या की, 'आपण लवकरच सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत.' यासोबतच त्यांनी सांगितले की, 'आमच्या सरकारच्या काळात भारतातील 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. 2047 पर्यंत आपण 'ग्लोबल लीडर' बनू असंही त्या म्हणाल्या.'

हे वाचलं का?

आपल्या भाषणाची सुरुवात करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'आमचं लक्ष गरीब आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर राहिलं आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मितीच्या दिशेने काम करण्याबाबतचे निर्णय आम्ही घेत आहोत. यामुळे आर्थिक विकासाला पाठबळ मिळत आहे. याचा परिणाम भारताच्या जीडीपीवरही दिसून आला आणि तो 7 टक्क्यांच्या वर राहिला. आम्ही निर्यात वाढवण्याचे काम केले आहे आणि जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच वाढवली आहे.'

सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे :

-  हा युवा शक्ती अर्थसंकल्प आहे. यामध्ये  शेतकरी, गरीब आणि सामान्य माणसाची काळजी घेण्यात आली आहे.

-  महसूली तूट कमी करण्यावर सरकारचा भर राहिला आहे.

-  उत्पादकता, जागतिक अनिश्चिततेचा मुकाबला, सबका विकास आणि सबका साथ यावर काम करायचे आहे.

-  पायाभूत सुविधा वाढवणे आणि मजबूत गुंतवणूक उभी करण्यावर लक्ष आहे. रोजगार निर्मिती आणि व्यापार सुधारणेवर भर आहे.

-  सार्वजनिक गुंतवणूकीवर सरकारचा भर आहे. आर्थिक विकास 3 कर्तव्यांवर केंद्रित आहे.

-  EMS PLI वाढवून 40 हजार कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव.

-  तामिळनाडू, केरळ आणि आंध्रप्रदेशमध्ये 'दुर्मिळ खनिजां'साठी (रेअर अर्थ मिनरल) कॉरिडॉर बनवणार.

-  एमएसएमई वृद्धी निधीसाठी 10 हजार कोटी रुपयांचा तरतूद करण्यात आली आहे.

-  सीतारामन म्हणाल्या, आम्ही ISM 2.0 ची सुरुवात करत आहोत. यामुळे सेमीकंडक्टरला चालना मिळेल.

-  इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

    follow whatsapp