ठाण्यात 16 वर्षीय मुलीनं इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन, नोटमध्ये लिहिलं 'कुटुंबावर ओझं..'

मुंबई तक

16 Feb 2026 (अपडेटेड: 16 Feb 2026, 09:18 PM)

Thane Crime : ठाणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलं आहे. एका किशोरवयीन मुलीनं उंच इमारतीवरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. एवढंच नाहीतर तिने एक सुसाईड नोट देखील लिहिली, 'कुटुंबावर ओझे होऊ नका, आनंदी राहा', असं त्यात नमूद केलं आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

'व्हॅलेंटाइन डे'ला होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद...

'व्हॅलेंटाइन डे'ला होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद...

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ठाण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस

point

16 वर्षीय मुलीने 14 मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं

Thane Crime : ठाणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलं आहे. एका किशोरवयीन मुलीनं उंच इमारतीवरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. एवढंच नाहीतर तिने एक सुसाईड नोट देखील लिहिली, 'कुटुंबावर ओझे होऊ नका, आनंदी राहा', असं त्यात नमूद केलं आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'तिच्यासाठी सगळ्यांना सोडलं, अन् आता तीच सोडून गेली'; सासूसोबत पळून गेलेल्या जावयाला गुलीगत धोका

16 वर्षीय मुलीने उंच इमारतीवरून उडी मारत संपवलं जीवन

ठाणे पश्चिम येथे सोमवारी 16 वर्षीय मुलीने उंच इमारतीवरून उडी मारत आपलं जीवन संपवल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. मोघारपाडा परिसरातील शुभसंकेत सहकारी गृहनिर्माण संस्था या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारतं जीवन संपवलं. आत्महत्या केलेली तरुणी ही अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. 

सुसाईड नोटमध्ये काय? 

घटनास्थळावर आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये 'कुटुंबाला माझे होऊ नये, आनंदी राहावे,'असं नमूद केलं होतं अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती.पुढे त्यांनी सांगितलं की, 'मुलीला ओवळे परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

हे ही वाचा : अडीच वर्षांच्या लेकीसोबत वडिलांचे अश्लील चाळे, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केला... पुढे काय घडलं?

तिच्या कुटुंबाचे आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत, असे त्यांनी सांगितले, सध्या या प्रकरणात कोणताही घातपात असल्याचा संशय नाही, अशी माहिती दिली.