मुंबईत 20 वर्षीय अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार, 5 महिन्यांची गर्भवती राहिली अन् DNA रिपोर्ट्सनंतर बापाला अटक

मुंबई तक

05 Feb 2026 (अपडेटेड: 05 Feb 2026, 12:06 PM)

कफ परेड परिसरात एका 20 वर्षीय दिव्यांग तरुणीसोबत तिच्या 50 वर्षीय वडिलांनी घृणास्पद कृत्य केल्याचं वृत्त आहे. या प्रकरणात कफ परेड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईत 20 वर्षीय अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार

point

5 महिन्यांची गर्भवती राहिली

point

DNA रिपोट्सनंतर बापाला अटक

Mumbai Crime: दक्षिण मुंबईतून अतिशय संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कफ परेड परिसरात एका 20 वर्षीय दिव्यांग तरुणीसोबत तिच्या 50 वर्षीय वडिलांनी घृणास्पद कृत्य केल्याचं वृत्त आहे. या प्रकरणात कफ परेड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. प्रकरणातील पीडिता ही ती मानसिकदृष्ट्या विकलांग असून तिला बोलता किंवा ऐकता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजेच तपासादरम्यान, ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं उघडकीस आलं. डीएनए चाचणीच्या रिपोर्ट्सनंतर, या प्रकरणाचा अलगडा झाला. 

हे वाचलं का?

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेने हातवारे करून पोटात विचित्र वेदना होत असल्याचं तिच्या आजीला सांगितलं होतं. त्यानंतर, कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं आणि मेडिकल टेस्टनंतर डॉक्टरांनी पीडिता 5 महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं. ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, रुग्णालयाच्या प्रशासनाने तात्काळ कफ परेड पोलिसांना याची माहिती दिली. 

वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? 

चौकशीदरम्यान, पीडिता तिच्या अपंगत्वामुळे स्पष्ट जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती. दरम्यान, तिच्या वडिलांनी सांगितलं की त्यांची मुलगी लहानपणापासूनच मानसिकदृष्ट्या अपंग आहे आणि तिच्यासोबत कोणत्याही प्रकरचा लैंगिक अत्याचार झाला नाही. तसेच, त्यांचं कुटुंब सुद्धा याबाबत कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचं देखील ते म्हणाले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला आणि पीडितेच्या काउन्सलिंगमध्ये तिने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी संमती दिली. 

हे ही वाचा: 12 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग! नेहमीच्या त्रासाला कंटाळून शाळा सोडली, पण शेवटी वाटेत अडवून भयंकर कृत्य

शारीरिकदृष्ट्या अपंग तरुणीचं लैंगिक शोषण 

मुलीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहिता (BNS) च्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंग तरुणीचं लैंगिक शोषण तसेच, जबाब देण्यास असमर्थ असलेल्या मुलीवर बलात्कार यासंबंधी कलमांचा समावेश होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 21 मार्च ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान ही घटना घडली आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी या प्रकरणाचा एफआयआर दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा: इंस्टाग्रामवर पत्नीचा प्रियकरासोबत फोटो पाहिला अन् वाद टोकाला पोहचला... रात्री घराबाहेर बोलवून पतीलाच संपवलं!

तपासादरम्यान, संशयितांच्या ओळखीच्या आधारे 17 हून अधिक लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आणि ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. गर्भाचं सॅम्पल देखील डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आलं. 27 जानेवारी 2026 रोजी, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात संबंधित गर्भाचा डीएनए पीडितेच्या वडिलांशी मॅच होत असल्याचं दिसून आलं. डीएनए रिपोर्ट्सच्या आधारे, पोलिसांनी मुलीच्या वडिलांची चौकशी केली आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून इतर संभाव्य बाजूंचा देखील तपास केला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.