Mumbai News : मुंबईतील मांटुंग्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कामावरून घरी परतणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला एका अनोळखी तरुणाने भररस्त्यात पॉर्न व्हिडिओ दाखवत, तिथून पळ काढल्याची घटना समोर आली. या प्रसंगी अनोळखी व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 डिसेंबर रोजी रात्री 11:45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : धावत्या रिक्षात महिलेवर सामुहिक बलात्कार, पोलिसांनी तीन नराधमांना उचललं; अमानवी कृत्याने देश हादरला
मुंबईतील माटुंग्यात तरुणीचा विनयभंग
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील माटुंग्यातील हिंदू कॉलनी लेन क्रमांक 2 येथील लखमशी नापू रोडच्या कोपऱ्यावर घडली आहे. एफआरआयनुसार, तरुणी ही दादर पूर्वेतील हिंदू कॉलनी येथील रहिवासी असलेली पीडित महिला मालाडमधील एका स्टुडिओमध्ये काम करते. घडलेल्या घटनेच्या रात्री तरुणी मालाडहून दादर रेल्वेस्थानकात उतरल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांच्या आयुष्यात करिअर आणि संपत्तीत लक्षणीय बदल होणार, काय सांगतं राशीभविष्य?
तरुणीला दाखवला पॉर्न व्हिडिओ
त्याचक्षणी एका तरुणाने हिंदू कॉलनीत दिदी अशी हाक मारत तरुणीला थांबवले. तेव्हा त्याने तरुणीला कसलाही पुढचा मागचा विचार न करता पॉर्न व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर तरुणीने आरडाओरड केली असता, तिनं घटनास्थळावरून पळ काढलं. तेव्हा तरुणाने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तरुण घटनास्थळावरून पसार झाला. पत्नी घरी परतल्यानंतर तरुणीने घडलेला हा सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











