बहिणीच्या अफेअरबद्दल कळालं अन् रुग्णालयात जाऊन थेट डॉक्टरवर हल्ला! मुंबईच्या केईएम रुग्णालयातील धक्कादायक घटना

मुंबईच्या परळ परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील केईएम (KEM) रुग्णालयातील 26 वर्षीय डॉक्टरवर हल्ला करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

रुग्णालयात जाऊन थेट डॉक्टरवर हल्ला!

रुग्णालयात जाऊन थेट डॉक्टरवर हल्ला!

मुंबई तक

31 Oct 2025 (अपडेटेड: 31 Oct 2025, 10:27 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बहिणीच्या अफेअरबद्दल कळालं अन् भावाचं भयानक कृत्य...

point

रुग्णालयात जाऊन थेट डॉक्टरवर हल्ला!

point

मुंबईच्या केईएम रुग्णालयातील धक्कादायक घटना

Mumbai Crime: मुंबईच्या परळ परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील केईएम (KEM) रुग्णालयातील 26 वर्षीय डॉक्टरवर हल्ला करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. हा हल्ला पीडित डॉक्टरच्या प्रेयसीच्या भावाने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात डॉक्टर गंभीररित्या जखमी झाला असून सध्या, रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

रुग्णालयात सहकारी महिलेसोबत प्रेमसंबंध

एजन्सीच्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी परळ येथे असलेल्या हनुमान मंदिराजवळील परिसरात घडली. या घटनेत जखमी झालेल्या पीडित तरुणाची ओळख डॉ. विशाल यादव अशी असून तो केईएम रुग्णालयाच्या सीव्हीटीएस (CVTS) विभागात कार्यरत आहे. पीडित डॉ. विशालचे रुग्णालयाच्या त्याच विभागात कार्यरत असणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. 

डॉक्टरवर चाकूने हल्ला केला... 

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या कुटुंबियांना नुकतंच तिच्या प्रेमसंबंधाबद्दल कळालं होतं. त्यानंतर, त्या तरुणीच्या भावाने रागाच्या भरात बहिणीचा प्रियकर म्हणजेच डॉक्टरवर हल्ला केला. प्रकरणातील आरोपीचं नाव फरीद खान असल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात फरीदसोबत त्याच्या दोन साथीदारांचा समावेश होता. तिघांनी मिळून पीडित डॉक्टरवर चाकूने हल्ला केला आणि या हल्ल्यात डॉक्टर अतिशय गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: 'आम्ही तारीख घ्यायला आलो होतो आणि आम्हाला..', बच्चू कडूंना CM फडणवीसांनी दिला 'तो' शब्द!

या घटनेनंतर, स्थानिक लोकांनी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमी डॉक्टरला रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल केलं. आता, पीडित तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी प्रकरणातील आरोपी फरीद खान, नबील आणि त्याच्या आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला घरी पाठवणारी टीम इंडियाची वाघीण, कोण आहे जेमिमा?

पोलिसांची माहिती 

बोईवाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तिन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि त्या संदर्भातील इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. सध्या, पोलीस आरोपीच्या अटकेसाठी छापे टाकत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, घटनेतील जखमी डॉक्टरचे जबाब नोंदवले जात आहेत. या घटनेमुळे रुग्णालयातील परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. 

    follow whatsapp